IFFCO Tokio जनरल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका; ग्राहकाला १ लाख ३९ हजार रुपये देण्याचे आदेश.
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1
आरोग्य विमा पॉलिसी असूनही हॉस्पिटल खर्चाचा दावा (क्लेम) नाकारल्याप्रकरणी IFFCO Tokio General Insurance Company Ltd. ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जालना यांनी दणका देत ग्राहकाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.जाफराबाद तालुक्यातील शिपोरा अंभोरा येथील सीमा अनिल अंभोरे यांनी स्वतः, पती व मुलगा यांच्यासाठी दिनांक२ नोव्हेंबर २०२३ रोजी IFFCO Tokio General Insurance Company Ltd. कडून १२ हजार ३३२ रूपये प्रीमियम भरून ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण असलेली पॉलिसी घेतली होती.विमा पॉलिसी सुरू असताना त्यांच्या मुलास दोन वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारासाठी सुमारे ४० हजार इतका खर्च झाला. आरोग्य विमा पॉलिसी अस्तित्वात असल्याने संबंधित खर्चाचा विमा दावा कंपनीकडे सादर करण्यात आला. मात्र, कंपनीने हॉस्पिटलचे बिल मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप अर्जदारांनी केला.यामुळे सीमा अंभोरे यांनी ॲड. दिलीप जंजाळ यांच्या मार्फत १७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जालना येथे तक्रार दाखल केली.प्रकरणाची सुनावणी व चौकशी केल्यानंतर आयोगाने अर्जदाराच्या बाजूने निर्णय देत संबंधित विमा कंपनीला रुग्णालय खर्चाच्या भरपाईसह एकूण १ लाख १९ हजार अदा करण्याचे तसेच मानसिक त्रास व न्यायालयीन खर्चापोटी २० हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे एकूण १ लाख ३९ हजार रुपये एवढी रक्कम अर्जदार सीमा अनिल अंभोरे यांना अदा करण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोग, जालना यांनी संबंधित विमा कंपनीला दिले आहेत. या निर्णयामुळे विमाधारक ग्राहकांच्या हक्कांना बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.यावेळी याप्रकरणाचे सर्व युक्तिवाद जालना येथील प्रसिद्ध वकील अँड. दिलीप जंजाळ यांनी पाहिले …


