बियाणे पाहूनच लागवड करावी — शेती मार्गदर्शक शंकर धनवाई, टेंभुर्णीच्या बाजारात बियाणे खरेदीसाठी बळीराजाची लगबग कडधान्यांवर सर्वाधिक भर

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.9
मान्सून राज्यात दाखल होण्याचे संकेत आणि हवामान तज्ज्ञांच्या अंदाजामुळे टेंभुर्णीच्या सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व लगबग सुरू झाली आहे. कडधान्य पिकांच्या बियाणे खरेदीसाठी अकोला देव, पापळ, काळेगाव, डावरगाव देवीसह परिसरातील गावांमधून आलेल्या बळीराजाने टेंभुर्णीची बाजारपेठ फुलून गेली होती. कृषी सेवा केंद्रांपुढे शेतकऱ्यांच्या बैलगाड्या व चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुकानांमधून बीडीएम-१६९, टीएयु-१ उडीद, चारु तूर अशा वेगवेगळ्या वाणांची विचारणा सुरू होती. हवामान विभागाने व हवामान अभ्यासक पंजाबराव डख आणि तोडतकर यांनी जालना जिल्ह्यासाठी पुढील ४ ते ५ दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ८ जूनपासून नक्षत्र बदलून मृग नक्षत्राची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वखरपाळी आणि ट्रॅक्टरने मशागत करून जमीन भुसभुशीत केली आहे. जमिनीत १ फूट ओलावा गेल्यानंतरच पेरणी उपयुक्त ठरत असली तरी, पावसाची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि औषधांची खरेदी वेळेआधीच सुरू केली आहे. बाजारात मूग (१४० ते १६० रुपये किलो), उडीद (१५० ते १७० रुपये), तूर (१८० ते २०० रुपये), मटकी (१२० ते १३५ रुपये) आणि हरभरा (९५ ते ११० रुपये) या कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाण्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र गेल्या हंगामात मूग आणि उडदाला ९००० ते १०००० रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी सुरूच ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि पीक पेरणीसाठी टेंभुर्णीतील शेतकरी मार्गदर्शक आज शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स 1) शेतकऱ्यांनी आपल्या मातीचा पोत तपासूनच बियाण्याची व खतांची निवड करावी. 2)पेरणीच्या दिवशीच 2 रायझोबियम लावून बियाणे सावलीत वाळवावे. 3)मूग-उडीद ३० बाय १० सेमी, तर तूर ९० बाय २० सेमी अंतरावर पेरावी. 4)वीस ते पंचवीस दिवसांनी एक खुरपणी केल्यास 4 उत्पादनात वाढ होते. 5) शेतकऱ्यांनी नेहमी कृषी सेवा केंद्रातूनच पॅकिंग असलेले उगवण क्षमता असलेले उत्पादनाची तारीख लिहिलेले बियाणे खरेदी करावी. उघड्या बियाण्यांची आणि खुल्या बियाण्यांची उगणक्षमता तपासूनच बियाणे खरेदी करावे. 6) शेती बियानाची आणि खतांची योग्य पद्धतीने पेरणी करावी. 7) कपाशीची लागवड करताना योग्य पद्धतीचे अंतर ठेवावे. कपाशीची निवड करताना शेत व्यवस्थित तयार करून घ्यावे. कपाशीचे अंतर योग्य पद्धतीचे असावे. भविष्यात कपाशी वन्य धान्यावर बियांची वर फवारणी करताना कृषी मार्गदर्शकाचा सल्ला घेऊनच फवारणी करावी असे आमच्या वृत्त प्रतिनिधीशी शंकर धनवाई शेतकरी मार्गदर्शक यांनी बोलताना सांगितले. त्यांच्यासाठी मी सदैव तयार असेल असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.




