टेंभुर्णी जुन्या बसस्थानकत एसटी येणे काळाची गरज, नाहीतर उपोषणाचे मार्ग
मुख्य बसस्थानकात बस साठी तरुणांचा पुढाकार. टेंभुर्णीच्या जुन्या खालच्या बसस्थानकापर्यंत एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी उपोषणाचे ग्रामपंचायतीला निवेदन!

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
टेंभुर्णी गावातील जुन्या खालच्या बस स्थानकापर्यंत बंद झालेली एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी एन एस यू आय चे जाफराबाद तालुकाध्यक्ष शुभम अंकुश मुळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. सदर निवेदन ग्रामसेवक जगदीश आढाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी अहवालानुसार जुन्या बसस्थानकापर्यंत एसटी बस पोहोचण्यामध्ये काही अडथळे असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये रस्त्यावरील अडथळे, मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारे दुचाकी वाहनांचे पार्किंग तसेच जुन्या बसस्थानक परिसरात एसटी बस वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे, या प्रमुख समस्यांचा समावेश आहे.
या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणावे, बस वळविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या संदर्भात यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली असून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीदेखील केली आहे. मात्र, अद्याप नागरिकांच्या समस्येचे समाधान झालेले नाही. जुन्या खालच्या बसस्थानकापर्यंत एसटी बससेवा बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करून त्याचा अहवाल द्यावा, तसेच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अन्यथा टेंभुर्णीतील नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा एन एस यू आय तालुकाध्यक्ष शुभम मुळे यांनी दिला आहे.
यावेळी शुभम मुगुटराव, रफिक पठाण, नासेर कुरेशी, भागवत घोडके, असलम शेख, शाहिद शेख, नरेंद्र कांबळे, अमीर शेख, फैजान शेख, समीर पठाण, हसन चाऊस यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. —————————-चौकट :- गावातील जुन्या बस स्थानकात आजही थांबा आहे. त्याची शेड उभारलेली आहे. त्याचे नियमित भाडे तत्त्वावर दिला जाते. भाडेही बस डेपो घेतो आहे असे समजते. तू ज्याला दिले जाते त्याच्याकडून तिथे कोणत्या प्रकारचं लोकांना सेवा दिली जात नाही. त्या बस स्थानकाच्या थांब्यासमोर आजही अनेक दुकान अनधिकृतपणे थाटलेली आहेत असे दिसते आहे. पंधरा वर्षांपूर्वी जे ग्रामपंचायत प्रशासन कार्यरत होते त्यांनी ही व्यवस्था केलेली दिसते आहे असे अनेक जाणकाराचे मत आहे. कोणाच्यातरी ऐकण्यावरून वरच्या बस स्टॅन्ड ला बस थांबा निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे हे सर्वश्रुत आहे. अनेक जाणकार सांगतात आजही अनेक लोक सांगतात की वैजापूर गाडीची फक्त खालच्या अंकात अतिक्रमण झाल्यामुळे बंद झालेली आहे सर्व बस गाड्या येथे होत्या आणि येत होत्या व संपूर्णपणे उभ्या राहत होत्या आज इथे माणसाला उभा राहण्यासाठी जागा नाही ते का यावर विचार होणे गरजेचे आहे. एका वयोवृत्त माणसाने सांगितले की इथली बस थांबा वरच्या बस स्टॅन्ड ला स्वतःच्या राजकारणासाठी आणि कोणातरी बाहेरच्या व्यक्तीचा ऐकून वर नेले आहे हे सत्य आहे. आता कुठे गावातली राजकारणी गेले बाजूला आता का थांबलेत आहेत, याच्या पाठीमागे फक्त राजकारण आहे गावातील व्यक्ती बोलत आहे.


