pub-7425537887339079
ब्रेकिंग

निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी साजरा.

0 4 6 0 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

सामाजिक जाणिवेतून एक आगळावेगळा सोहळा उरण मध्ये पार पडला.निसर्ग प्रेमी नागेंद्र म्हात्रे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या जिवलग मित्रांनी आणि हितचिंतकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लावला. रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरली आहे. वाढदिवसा निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.रा.जि.प. शाळा, पाले: येथे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे सर (पाले) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना छत्री आणि खाऊ वाटप करण्यात आले.रा.जि.प. शाळा, पाले: येथे आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर सर (खोपटे) यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना ओळखपत्र (आयकार्ड) वाटप करण्यात आले.अंगणवाडी सारडे येथे सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावंड सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या.रा.जि.प. शाळा, आवरे येथे तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.श्री राधाकृष्ण महिला ग्रुप, सारडे: महिला भगिनींतर्फे शाळेत खाऊ वाटप करण्यात आले.रा.जि.प. शाळा, सारडे येथे हॉटेल MDS चे मालक नितीन म्हात्रे आणि आतिश म्हात्रे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.रा.जि.प. शाळा आणि अंगणवाडी, कडापे येथे प्रशांत म्हात्रे सर (कडापे) यांच्या मार्फत लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.रायगड जिल्हा परिषद शाळा कोपरगाव येथे ‘युवक आधार’च्या पत्रकार ॲडव्होकेट रणिता ठाकूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कौतुकास्पद उपक्रमाच्या वेळी रा.जि.प. शाळा पालेचे शिक्षक प्रशांत कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन म्हात्रे, उरणमधील सुप्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक, सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठानचे संतोष जोशी , जितेंद्र म्हात्रे, सचिन पाटील, UFPO चे संचालक प्रकाश माळी, अमोल पाटील, हितेश म्हात्रे, सारडे अंगणवाडी सेविका संजीवनी ताई म्हात्रे इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री राधाकृष्ण महिला ग्रुपच्या सुलक्षणा ताई पाटील, भगवती ताई पाटील आणि कविता ताई गावंड पाटील, कल्पना ताई पाटील, यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र म्हात्रे, (पाले), उपेंद्र ठाकूर, नितीन म्हात्रे आणि प्रकाश माळी यांचे मोलाचे योगदान लाभले. वाढदिवसाला केवळ शुभेच्छा न देता, समाजातील घटकांसाठी एवढा मोठा आणि स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या सर्व जिवलग मित्रांचे, अधिकारी वर्गाचे, शिक्षक बंधूंचे, महिला भगिनींचे आणि उपस्थित सर्वांचे नागेंद्र म्हात्रे यांनी मनापासून आभार व्यक्त केले!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे