pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद तालुक्यात एक हजार मुलींसाठी मानव विकासच्या ११ मोफत बसेसची सोय, जाफराबाद १०१ गावांतील मुलींना होणार या बसेसचा फायदा

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

जाफराबाद तालुक्यातील टेभुर्णी, खासगाव, वरूड बु., सिपोरा अं., माहोरा, अकोलादेव, कुंभारझरी, आळंद, सावंगी, गोंधनखेडा यासह तालुक्यातील १०१ गावांतील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी १ हजार ५० विद्यार्थिनी शिक्षणासाठी जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळा, सिद्धार्थ महाविद्यालय, समर्थ विद्यालय, ज्ञानसागर जिजाऊ विद्यालय यासह विविध शाळा तथा महाविद्यालयांमध्ये येतात. यावर्षी २०२६-२७ चे शैक्षणिक सत्र १५ जून, सोमवारपासून सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणवाढीसाठी शासनाच्या वतीने मुलींच्या शिक्षणासाठी मोफत प्रवास मानव विकास बसेसमधून दिला जातो. शासनाच्या वतीने हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबविला जात आहे. याला जाफराबाद मानव विकासच्या बस रूटची नियोजन बैठक पार पडली. तालुक्यातील विद्यार्थिनींकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे. या चालू शैक्षणिक वर्षातील बस रूट समितीची बैठक गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी कार्यालयात १७ जून, बुधवार रोजी संपन्न झाली. यात जाफराबाद ते देऊळगावराजा, जाफराबाद ते चिखली, जाफराबाद ते भोकरदन हे रूट निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावरील विविध फाट्यांवरील जाफराबाद येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. यासाठी मानव विकासच्या ११ बसेस विद्यार्थिनींना शाळेपासून त्यांच्या गावांपर्यंत प्रवास सेवा पुरवणार आहेत. त्यामुळे शिक्षणापासून कुणीही वंचित राहता कामा नाही. याची दक्षता शिक्षण विभाग तथा शासन घेत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा फायदा घेऊन आपले ध्येय निश्चित करावे. ध्येयप्राप्तीसाठी परिश्रम करावेत. एक ना एक दिवस ते ध्येय गाठावे. आपले पालक, गाव, या वेळी गटशिक्षणाधिकारी वा सतीश शिंदे व सर्व केंद्रप्रमुख, ठा मुख्याध्यापक तथा तालुका समन्वयक भगवान चव्हाण सह आगार प्रमुख शरद पंडित, राहुल कुंठे यांच्यासह शिक्षण विभाग व आगार व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने स्त उपस्थिती होती. यावेळी उप वतीने मानव बसेसमधून अ विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास अ शासनाच्या विकासच्या मिळत असल्याने मुलींना पो शिक्षणाची गोडी निर्माण झाली आ आहे. शिक्षणाच्या बाबतीत मुलींचा टक्काही वाढला आहे. यामुळे गरीब, होतकरू, हुशार मुलींना मोठा दिलासा मिळत असल्याच्या भावना अनेक विद्यार्थिनींनी व्यक्त केल्य तालुका, जिल्हा, राज्याचे आ नावलौकिक करावे. आपले या जीवनमान समृद्धपणे जगावे. असे आवाहन शिक्षण विभागाच्या अ मार्फत करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे