pub-7425537887339079
ब्रेकिंग

उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने बळीराजा आक्रमक, हमीभावाने शेतकऱ्यांचा माल विकत घेणे, कृषी कर्जाची व्यवस्था निर्माण करणे, गरजेचे

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.26

ऐन खरीप हंगामात शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असतानाच बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे जगाच्या पोशिंद्यावर थेट आर्थिक संकट कोसळले असून शेतकऱ्यांपुढे पेरा की मरा असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. जाफ्राबाद तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात गेलेल्या शेतकऱ्यांना गेल्यावर्षपिक्षा ३० ते ४० टक्के जास्त दर ऐकून घाम फुटला असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. खतांची लूटमार बाजारपेठेत खतांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप होत असून डीएपी खताची गोणी १३५० रुपयांवरून थेट १९०० रुपयांवर पोहोचली आहे. युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेटच्या प्रत्येक गोणीमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. बियाण्यांचे चौकट:- शेतकऱ्यांच्या हिताची निर्णय व्हावे “यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील मशागत करून पेरणीसाठी लगबग सुरू असताना कृषी सेवा दुकानात बियाणे रासायनिक खतांच्या किमती ऐकून धक्का बसला. सरकारने आमच्याही मालाला योग्य भाव जाहीर करावा., नाफेडचे तसेच सरकारी खरेदी केंद्र सर्वच ठिकाणी सुरू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या खर्च कमी लागेल, हमीभावापेक्षा कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचा म** घेऊ नये व तात्काळ रक्कम उपलब्ध करून देण्याची वाजता शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारने करणे गरजेचे आहे रमेशराव खरात : शेतकरी शेतकरी, हितचिंतक, चौकट :- जास्त भावाने विक्री करू नये “सर्व कृषी सेवा केंद्राने बी बियाणे खतांच्या किमती वाढू नये, शेतकरी मेटाकुटीला येईल अशी स्थिती निर्माण करू नये, अशी शेतकऱ्यांच्या वतीने सर्व कृषी केंद्रांना विनंती करतो आहे. विश्वनाथ सांगोळे — शेतकरी भावही गगनाला भिडले असून सोयाबीनच्या एका बॅगची किंमत ४५०० रुपयांवरून ६००० रुपयांच्या पार गेली आहे. कापसाचे बियाणे ८०० रुपयांवरून १२०० रुपयांवर गेले असून बीटीच्या नावाखाली लूटमार सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खर्च दुप्पट झाला असताना मालाला मात्र निम्मा भाव मिळत आहे. शेतकऱ्याच्या घरातून कापूस, सोयाबीन, तूर, मका निघाला की व्यापारी मातीमोल भावाने खरेदी करतो आणि तोच माल व्यापाऱ्याच्या गोदामात जाताच दरात चौकट :- शेतकऱ्यांच्या हिताचा हमीभाव जाहीर होणे गरजेचे “केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने कापूस, मका, सोयाबीन आदी पिकांचा शेतकऱ्यांच्या हिताचा हमीभाव जाहीर करून आदेशित करावे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. यावर्षी सगळ्याच गोष्टींची भरमसाठ महागाई वाढली. डिझेल, शेत नांगरणी, मशागत, मजुरी, यामध्ये वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींचा सरकारने विचार करून योग्य हमीभाव जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना सरकारने त्यांच्या बाजूने उभे राहून, शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी बँकातून जास्त कर्ज मंजुरी, याकडे लक्ष दिले पाहिजे. – संतोष आवटी थट्टा आहे. मोठी वाढ होते, ही शेतकऱ्यांची थेट हमीभावाची मागणी खत-बियाण्यांचे भाव वाढवता, मग आमच्या मालाला हमीभाव का देत नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. मजुरी ५०० रुपये रोज झाली असून डिझेल ११० रुपये लिटर झाले आहे. अशा स्थितीत कापूस ५००० रुपये क्विंटल आणि सोयाबीन ४००० रुपये क्विंटल का, असा थेट प्रश्न विचारला जात आहे. या वाढत्या महागाईमुळे मुलांचे शिक्षण आणि लग्न कसे करायचे, असा चिंताजनक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यावर तातडीने उपाययोजना म्हणून कापसाला ९५००, सोयाबीनला ७५००, तुरीला ९००० आणि मक्याला ३००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली जात आहे. तसेच कृषी सेवा केंद्रांमधील कंपन्यांची नफेखोरी रोखून सबसिडी वाढवावी आणि बाजार समित्यांमधील दलाली बंद करून शेतकऱ्यांना थेट माल विकू द्यावा, अशी मागणी होत आहे. बळीराजाला देशोधडीला लावल्यास सत्ता उलथवून लावू, असा इशारा देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे