pub-7425537887339079
ब्रेकिंग

दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पूर्वतयारीचा आढावा

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.11

भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार यावर्षी आगामी कालावधीत मराठवाडा विभागावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने आज दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कांवरिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी श्रीमती पगारे यांची उपस्थिती होती. यावेळी मित्तल म्हणाल्या की, भारतीय हवामान विभागाने यावर्षी पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि कृषी विभागांनी आतापासूनच आवश्यक नियोजन करुन ठेवावे. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. तसेच पाणीपूरवठा योजनेतील सर्व कामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच पशुधनास चाऱ्याची कमतरता उद्भवू नये यासाठी आतापासूनच पशसंवर्धन विभागने पूर्वनियोजन करावे. “दूष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे