pub-7425537887339079
ब्रेकिंग

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी लहाने यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ घाडगे योगशिक्षक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन येथील योग प्रशिक्षक रवी गावंडे सर यांचे प्रमुख उपस्थिती होती जिजाऊ कॅम्पस टेंभुर्णी येथे जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय तसेच सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, जिजाऊ आर्ट कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेज राजमाता जिजाऊ टेंभुर्णी या सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी लहाने यांनी विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी नियमित व्यायाम व योगासने आपल्या दैनंदिन जीवनात करावे व निरोगी राहावे योगशिक्षक एकनाथ घाडगे तसेच रवी गावंडे सर यांनी विद्यार्थ्यांना योगासने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि मानसिक शांततेसाठी कशी आवश्यक आहेत हे सोप्या भाषेत पटवून दिले तसेच योग ही आपली प्राचीन भारतीय परंपरा असून ती दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प सर्वांनी करावा विद्यार्थ्यांना त्यांनी याप्रसंगी ताडासन,भुजंगासन, अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम यासारख्या अनेक आसनांचे अचूक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना करून दाखवले कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले योग दिनानिमित्त शाळेच्या वतीने संपूर्ण परिसर उत्साह आणि सकारात्मक वातावरणाने भरून गेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राधा तिवारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जिजाऊ शैक्षणिक संकुल जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, मी जाऊ कनिष्ठ महाविद्यालय कुंभारझरी, जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे