pub-7425537887339079
ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीच्या रकमेचा चौथा हप्ता जमा 

0 5 2 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दि. ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या व दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महाआयटीची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर जिल्ह्यातील बँकांनी एकूण १,९९,५२५ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करून आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी ९९,३७१ पात्र लाभार्थ्यांना यापूर्वी कर्जमुक्तीची रक्कम रु. ७५८.२३ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

दि. ०४ नोव्हेंबर, २०२६ रोजी सदर योजनेच्या महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करून आधार प्रमाणिकरण केलेल्या ३९,९८१ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. ३५३.५२ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. अशी एकूण चार हप्त्यांमध्ये आधार प्रमाणिकरण केलेल्या १,३९,३५२ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. १,१११.७५ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. जालन्याच्या एकूण ८,७७९ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. २४.२७ कोटी तर इतर राष्ट्रीयकृत / खाजगी / व्यापारी / ग्रामीण बँकांचे १,३०,५७३ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. १०८७.४८ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या चार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून त्यात जालना जिल्ह्यातील एकूण १,७४,२५७ पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी १,४६,१९० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले असून, अद्यापही २८,०७६ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण केलेले नाही. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतरच त्यांची कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सदर यादीतील शेतकऱ्यांनी यादीतील त्यांचा विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, अंगठा स्कॅन / फिंगर आयडी इ. कागदपत्रे घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले नाही त्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार स्कॅन / फिंगर आयडी ची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था विष्णु रोडगे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे