pub-7425537887339079
ब्रेकिंग

वाणिज्य व नियोजन मंडळाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, आर्थिक साक्षरता – प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के यांचे प्रतिपादन

0 4 9 7 3 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबा/दत्ता देशमुख,दि.27

सिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफ्राबाद येथे वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘वाणिज्य व नियोजन मंडळ उद्घाटन समारंभ’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगरचे सचिव मा. प्रा. डॉ. राहुल भाऊ म्हस्के* होते. कार्यक्रमाचे उद्घाटन *बँक ऑफ महाराष्ट्र, जाफ्राबाद शाखेचे शाखा व्यवस्थापक मा. श्री. विलास झारखंडे* यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य *प्रा. डॉ. मेढे एस. एल.*, उपप्राचार्य *प्रा. हिवराळे व्ही. टी.* तसेच वाणिज्य विभागप्रमुख *प्रो. डॉ. बिरादार एम. बी.* यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर स्वागत समारंभ पार पडला.
यावेळी उद्घाटक मा. श्री. विलास झारखंडे* यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य, बँकिंग, आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक आणि बदलत्या आर्थिक क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक आर्थिक ज्ञान आत्मसात करून भविष्यातील करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात *मा. प्रा. डॉ. राहुलभाऊ जे. म्हस्के* यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासमंडळांच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करताना वाणिज्य व नियोजन मंडळाच्या या उद्घाटन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, आर्थिक साक्षरता आणि नियोजन कौशल्य विकसित करण्यास निश्चितच मदत होणार आहे आणि अशा मंडळांमधून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील आर्थिक व व्यावसायिक व्यवहारांचे ज्ञान मिळते, असे प्रतिपादन केले. वाणिज्य व नियोजन मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, व्यावसायिक व मार्गदर्शनपर उपक्रमांची संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. मेढे एस. एल. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पगारे एम. पी.यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती मणियार एस. आर. यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुरेख भित्तिपत्रके तयार केली, त्यांचे उच्चाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता *राष्ट्रगीताने* झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 3 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे