pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”

0 4 8 2 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.8 

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना अणि पोलिस अधीक्षक कार्यालय,जालना यांचे संयुक्त विद्यामानाने दिनांक 15फेब्रुवारी, 2026बुधवार रोजी बॅडमिंटन हॉल,पोलीस ग्राऊंड, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, जालना.येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”आयोजित करण्यात आला आहे. यासाठी 623 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध आहेत. रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळाव्याचे आयोजीत करण्यात येत आहे.या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून623रिक्तपदे एचएससी, कोणतेही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, फिल्‍ड असिस्टंट मॅनेजर, अप्रेन्‍टीस ट्रेनी,असिस्टंट ब्रांच मॅनेजर,ब्रांच ऑप्रेशनल मॅनेजर,संगणक ऑपरेटर,अप्रेंटिस,ड्रायव्हर,सेल्सएक्झिक्युटिव्ह,सर्व्हिस अॅडव्‍हायझरअसिस्टंट टेक्न‍िशियन, CMYKPY TRAINEEइत्यादी) 18 ते35 वयोगटातीलपात्रताधारकउमेदवारांसाठीपदे उपलब्ध झालेली आहेत. तसेच या रोजगार मेळाव्यात मुख्यामंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शासकीय आस्थापनेमध्ये 11 महिन्याच्या प्रशिक्षणाकरीता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या साठी उमेदवारांनी योजनेच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Intern म्हणून नोंदणी करावी. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी ईच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा.तसेच,उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी, किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील रिक्त पदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 10वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदरा खालील जालना जिल्हा निवडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावायामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा.या मेळाव्याचा जास्तीत जास्त नोकरी उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे