pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबादमध्ये पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६ अंतर्गत रविवारी जाफ्राबाद शहरातील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर पालकांनी आपल्या चिमुकल्यांना घेऊन उपस्थिती लावली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक बालकाला पोलिओची लस देत पालकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. पोलिओ हा गंभीर आणि अपंगत्वास कारणीभूत ठरणारा आजार असून, त्यावरील प्रभावी उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मोहिमेत आशा सेविका वंदना हिवाळे यांनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. तसेच सय्यद फईम, हिवाळे आणि पत्रकार शेख अजीम यांनीही मोहिमेला भेट देऊन जनजागृतीसाठी सहकार्य केले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळविला असला तरी तो कायम राखण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ म ोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शहरासह ग्रामीण भागातील विविध लसीकरण केंद्रांवरही मोठ्या प्रमाणात बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली. पोलिओमुक्त भारत घडविण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षित, सुदृढ आणि निरोगी भविष्यासाठी पोलिओ लसीकरण अनिवार्य आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे