pub-7425537887339079
ब्रेकिंग

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. सजग नागरिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन.

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

माहिती अधिकार कार्यकर्ता संघ — उरण तालुकाच्या वतीने उरण तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सदस्यांसाठी तसेच नवीन नोंदणीसाठी फॉर्म भरलेल्या कार्यकर्त्यांसाठी शनिवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठिक ५ वाजता एकदंत अपार्टमेंट उरण शहर येथे विशेष विचारविनिमय बैठक व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण, अर्ज, अपील व तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, संघटनात्मक कामकाज व पुढील नियोजन, नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तरी उरण तालुक्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त मोठया संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शेळके दत्तात्रय 8369111167, सुनील जोशी 8286442067,विश्वास पटवर्धन 8452085330

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे