pub-7425537887339079
ब्रेकिंग

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा

जमीन, घरे, गावे, समाज वाचविण्यासाठी तिसऱ्या मुंबई विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन.

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

०४ मार्च २०२४ च्या अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील उरण-पनवेल-पेण तालुक्यातील १२४ गावे केएससी नवनगर अर्थात तिसऱ्या मुंबई प्रकल्पात समाविष्ट केली. ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांत प्रचंड चीड, संताप आणि असंतोष निर्माण झाला. कारण सरकारने येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वराज्य संस्था आणि शेतकरी यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. त्यामुळे १२४ गावांतील सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या लेखी हरकती सरकारकडे दाखल केल्या. परंतु शेतकऱ्यांनी एवढ्या प्रचंड संख्येने दाखल केलेल्या हरकतींची दखल न घेताच सरकारने दि. १६ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांच्या जमीनी २२.५% ची फसवी योजना लागू करून संपादन करण्याचा इरादा स्पष्ट केला. शासनाची ही कृती निश्चितच लोकशाही विरोधी आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना दि. ०५/०२/२०२५, दि. २३/०२/२०२६, दि. ३०/०३/२०२६ च्या पत्रान्वये शेतकऱ्यांची,जमीन मालकांची म्हणणे ऐकून घेण्यासाठी विनंती केली. परंतु सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांना, जमीन मालकांना कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.या मुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या शेतकरी, जमीन मालक यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, आता शेतकरी व जमीन मालक यांना जमीन, घरे, गावे आणि समाज वाचविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही.त्यामुळे सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच एक भाग म्हणून तसेच सदर लढा तीव्र करण्यासाठी,या संघर्षाची घोषणा करण्यासाठी रविवार दि. ७ जून २०२६ रोजी संध्या. ४.०० वाजता मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्मारक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी न्यायमूर्ती यांचे विचार ऐकण्यासाठी व या लढ्यात सक्रिय होण्यासाठी स्थानिक भूमीपुत्रांनी, शेतकरी, जमीन मालकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगड च्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे