वीजपुरवठा सुरू होण्याआधीच विद्युतखांब कोसळले

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.28
वीजपुरवठा सुरू होण्याआधीच विद्युत खांब कोसळल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी फाटा ते डोलखेडा रस्त्यावर घडली . याबाबत माहिती अशी की गेल्या महिनाभरापूर्वी वीज वितरण कंपनी चे विद्युत खांब रोवण्याचे व तार ओढण्याचे काम गुत्तेदारामार्फत करण्यात आले. गुत्तेदाराने विद्युत खांब चक्क रस्त्यावरच रोवले आहे .त्यामुळे हे खांब रस्त्याच्या मोकळ्या मातीत रोवल्याने कोसळत आहेत .तसेच विद्युत खांब सरळ रेषेत रोवले नसून खांबांना योग्य ठिकाणी तान लावण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा कळस झाल्याचे प्रवाशा मधून बोलले जात आहे .परिसरात गेल्या दोन दिवसा अगोदर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळी पावसात हे खांब पडल्याचे योगेश बंगाळे यांनी सांगितले. सदरील कोसळलेले विद्युत खांब तात्काळ उभे करावेत अशी मागणी परिसरातील नागरिक व प्रवाशांनी केली आहे .




