शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने शिव राज्याभिषेक सोहळ्याचे ओचित्य साधून अनाथाश्रमध्ये शालेय कीट चे वाटप.

उरण/विठ्ठल ममताबादे’दि.16
शिव प्रतिष्ठान करंजाडे या सामाजिक संस्थेने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ओचित्य साधून अनाथ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून एक समाजापूढे आदर्श निर्माण केला आहे.ह्या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सुनील अंबावडे,प्रशांत श्वट्टी,अमर कुसले, शिव प्रतिष्ठान सचिव राकेश कुसले, योगेश कुलाल, अथर्व आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या वेळेस गिरीजा फॉउंडेशन च्या संस्थापिका सुनिता मॅडम ने प्रसार माध्यमाशी बोलताना असे सांगितलं की शिव प्रतिष्ठान गेल्या दोन वर्षापासून सर्व अनाथ निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य असुद्या किंवा राशन असुद्या नेहमीच ते आमच्या गरजा पूर्ण करत असतात म्हणून शिव प्रतिष्ठान ची समाजाप्रती काम करण्याची जी जिद्द आहे अश्या जिद्दीला आमचा सलाम आहे.येणाऱ्या कालावधील मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते की शिव प्रतिष्ठान करंजाडे ला एक सामाजिक पुरस्कार देण्यात यावा.त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. शिवप्रतिष्ठान करंजाडे या सामाजिक संस्थेतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. सदर राबविलेल्या उपक्रमामुळे अनाथ निराधार मुलांना अत्यंत गरजेचे असलेले शैक्षणिक साहित्य किट प्राप्त झाल्याने त्यांनी आनंद व समाधान व्यक्त करत शिवप्रतिष्ठान करंजाडेचे आभार मानले आहेत. सदर उपक्रमाचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत असून असे उपक्रम सर्वत्र राबविले पाहिजे अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहे.



