विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; शिक्षकांना ग्रामसभेच्या सचिव पदाच्या कामातून सूट देण्याची प्राथमिक शिक्षक संघाची मागणी!”

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
जालना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना ग्रामसभेचे सचिव म्हणून दिलेले अतिरिक्त काम रद्द करण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ, जालना च्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनाद्वारे कार्याध्यक्ष श्री. सुभाष भडांगे आणि जालना तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद पवार यांनी प्रशासनाकडे शिक्षकांच्या हक्काची आणि विद्यार्थ्यांच्या हिताची आग्रही मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या
१)नुकत्याच SIR च्या कामातून मुक्त होऊन शाळा पूर्णवेळ सुरू झाल्या आहेत. अभ्यासक्रम मागे पडल्यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. अतिरिक्त अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
२)शासन आदेशाप्रमाणे हे काम इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात यावे.
३)विद्यार्थ्यांचे भविष्य आणि दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम करू द्यावे.



