pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफराबाद तालुक्याच्या वतीने मनीष श्रीवास्तव यांचा सत्कार,

पक्ष संघटनांवर भर देत गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम राबविणार - श्रीवास्तव...

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी – शिवाजीनगर येथील हनुमान मंदीरात दि.०८ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नुकतेच नियुक्ती झालेले, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांचे तालुक्याच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पक्ष प्रमुख मा.उद्धव जी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवत जिल्हा प्रमुख पदाची जी जबाबदारी सोपवली, त्याला माझ्याकडुन कुठेही तडा जाऊ न देता त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठेवीन अशी ग्वाही दिली. तर माझा शिवसैनिक,शाखाप्रमुख, उपतालुका प्रमुख,तालुका प्रमुख,उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रवास असल्यामुळे माझ्या अनुभवाचा पक्षासंघटनासठी नक्कीच कमी आणील असेही सांगितले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गाव तिथे शखा व घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्याचा माझा मानस असून त्यात तुम्हा निष्ठावंत शिवसैनिकांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे.त्यामुळे शिवसैनिक ते सामान्य कार्यकर्ता हे कुठल्याही प्रकारच्या संकटात असो वा त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून कुठलाही अन्याय झाला तर सर्वात पुढे मी राहील अशी ग्वाही दिली.त्यामुळे येणाऱ्या काळात कुठलेही मतभेद न करता सर्वांनी पक्ष वाढीसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.तर तालुका प्रमुख कुंडीलक पा.मुठ्ठे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर जगताप, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद जाधव यांनी केले,तर आभार युवकचे उपतालुकाप्रमुख मुकेश माकोडे यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी प.स. सदस्य किसन जोशी, चिमाजी उखर्डे,जेष्ठ शिवसैनिक तथा माजी सरपंच विष्णु पा.म्हस्के, हरीचंद्र म्हस्के, दत्तू सुद्रिक, जनार्दन झोरे, शिक्षक बाळू धनवई, देविसिंह बायस, परमेश्वर सरोदे, शिवाजी म्हस्के, समाधान सवडे, दिगंबर जाधव, बळीराम शेजुळ,दगडु तांबेकर,चंदू शिंदे,विष्णु लोखंडे,नागोराव बंगाळे, योगेश कापसे, गणपत बनकर, कुंडलिक बनकर, कारभारी पाचे, रामेश्वर खांडेभराड,योगेश शर्मा, शेख इरफान, समीर शहा, सुलतान कुरेशी,नंदू भालके,नंदू गायकवाड, सचिन म्हस्के, यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे