छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांचा उद्धार केला- प्रा. सुनिल बनसोडे

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27
श्रीमती.जे. बी. के. विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रा. सुनिल बनसोडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी परंपरेची चौकट मोडुन बहुजनांचा उद्धार केला असे गौरवोद्गार काढले. सुरूवातीला प्रतिमा पुजन करून, छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील बनसोडे हे होते, तर आर.टी. इंगळे व पर्यवेक्षक बी.यु. ससाने यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी बोलत असतांना राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, पद- दलितांच्या जीवनाचा उद्धार केला. त्यांचे जीवनमान उजळून टाकले असे प्रतिपादन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, व्यापाऱ्यांसाठी व्यापारी पेठा निर्माण केल्या, शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान विकसित केले. राधा नगरी सारखे धरण बांधून जलसिंचन सुविधा निर्माण केल्या, बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षण दिले व आरक्षणातून समता, स्वातंत्र्य, बंधुता, समानता या तत्त्वांचा पुरस्कार केला. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण योगदान दिले. या कार्यक्रमात आर. टी. इंगळे सर यांनी छत्रपती शाहूंनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शेती विषयक, अशा अनेक अनेक विकासात्मक धोरणांचा पुरस्कार करून जनसामान्यांचे जीवनामान अमूलाग्र बदलुन टाकले असे प्रतिपादन केले. तर गौरव इंगळे या छोट्या वक्त्याने शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी ओघवत्या शैलित आपले मत मांडले. कार्यक्रमाला वासुदेव क्षीरसागर, दत्ता उखर्डे, प्रा.गजानन धोटे, दिनकर उखर्डे, नागोराव देशमुख, दीपक देशमुख, अनिकेत गोफणे आदींची उपस्थिती होते.




