दुष्काळ सदृश्य परिस्थितीत विद्यार्थ्यांना पत संस्थांनी मदत करावी – शिक्षणाधिकारी बाळू खरात,
भगतसिंग शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेचा दीपावली स्नेहमिलन मेळावा संपन्न

जालना/प्रतिनिधी, दि.1
दिनांक १ नोव्हेंबर आज सागर इन या हॉटेलमध्ये भगतसिंग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित जालना यांचा २० वा दीपावली स्नेह मिलन मेळावा संपन्न झाला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस चेअरमन तथा मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे यांनी केले तर अहवाल वाचन सचिव तथा कोषाध्यक्ष नारायण मुंडे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन आरेफ कुरेशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात व वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधीक्षक चतरसिंग परदेशी तसेच बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व प्रसिद्ध अर्थतज्ञ मारोती तेगमपुरे हे होते यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या शुभेच्छा पर भाषणात सांगितले की दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पतसंस्थेने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य म्हणून विधायक कार्य हाती घ्यावे त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात खंड न पडू देता त्यांच्यासाठी अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे व त्यांच्या पालकांसाठी दिवाळी गोड करण्यासारखे स्तुत्य उपक्रम हाती घ्यावे असा संदेश दिला त्यानंतर वेतन अधिक्षक चतरसिंग परदेशी व प्राध्यापक मारुती तेगमपूरे यांनी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात आपल्या स्वतःच्या मालकीची व हक्काची इमारत असावी असा विश्वास व्यक्त केला व पतसंस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा व समायोजित भावना व्यक्त केल्या समारोपीय भाषणात चेअरमन आरेफ कुरेशी यांनी सांगितले की माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्याप्रमाणे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पतसंस्थेच्या वतीने विधायक कार्य हाती घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल व पतसंस्थेच्या सभासदासाठी येत्या वर्षात गट विमा काढून त्याच्या कर्जाला आर्थिक कवच निर्माण करून दिल्या जाईल अशी शाश्वती दिली व रौप्य महोत्सवी वर्षात संस्था आपल्या स्वतःच्या इमारतीत वार्षिक सर्वसाधारण सभा घेईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रेमदास राठोड, संघाचे सचिव तथा तज्ञ संचालक संजय येळवंते, जगन वाघमोडे, हकीम पटेल,भगवान धनगे संध्या पवार,रेणुका मिसाळ,वर्षा मुंडे, अरुण आंधळे, गणेश चव्हाण, भीमाशंकर शिंदे, गणेश मेहत्रे,
प्रद्युम्न काकड या सर्व संचालकांनी व सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक तथा माजी सिनेट सदस्य भागवत काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवान धनगे यांनी केले शेवटी स्नेह भोजनाचा सर्वांनी आनंद घेतला



