pub-7425537887339079
ब्रेकिंग

त्रिमुर्ती दिव्यांगाचा जन्म अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळाव्यात आलेल्या दिव्यांगाचा सन्मान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या तर्फे सन्मान माहुर येथे उत्साहात संपन्न

0 4 6 3 4 1
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि.17

दिव्यांग चळवळीचे प्रणेते तथा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री चंपतराव पाटील डाकोरे यांच्या जन्म अभिष्टचिंतन निमित्त भव्य दिव्यांग सन्मान सोहळा राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श भुषण पुरस्कार सत्कार पुणे येथे सन्मानित केलेल्या डाकोरे पाटील यांचा सत्कार सोहळा कपिलेश्वर धर्मशाळा माहुर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग संघटनेचे मराठवाडा सं.प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे हे होते. प्रमुख पाहुणे भागवताचार्य हभप रामेश्वर महाराज, वारकरी संस्था माहुर हभप निवृती महाराज, वंदे भारत टि. व्हि प्रतिनिधी,मनोहरराव येरपुरवार, गणपत गौड, शिवाजी गुटे, मानसिंग वडजे, खांडरे, उपस्थित होते. प्रथम दिप प्रज्वलन करून आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचा शाल पुष्पहार घालुन दिडशे दिव्यांग बांधवांचा दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या मार्फत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुण्याचा सन्मान सत्कार दिव्यांग संघटना माहुरच्या वतीने करून नंतर त्रिमुर्ती दिव्यांगाचा जन्म अभिष्टचिंतन मा.चंपतराव डाकोरे पाटील,प्रदिप शेरकुरवार,रेवा राठोड यांचा जन्मदिन केक कापून अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन दिव्यांग संघटनेचे सल्लागार प्रेमसिंग चव्हाण यांनी केले. प्रस्तावित जिल्हा ऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांनी हा अभिष्टचिंतन सोहळा व सन्मान सत्कार बदल बोलताना दिव्यांग, वृध्द निराधार बांधवांसाठी मा. डाकोरे पाटील यांना दोन्ही पाय नसताना सतत संघर्ष करुन गावपातळीवर दिव्यांग सवलती साठी संघर्षामुळे आज गावपातळीवर दिव्यांग बांधवाना हक्क मिळत आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र भर घेऊन त्यांना आतापर्यंत ३८ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अशा संघर्षमय नेत्यांसोबत आपण सर्वांनी संघटितपणे संघर्षात सहभागी होण्याचे आव्हान केले. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना मा. चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिव्यांग संघटनेच्या चळवळीची माहिती सर्वाना सवलती हक्क मिळावे म्हणून व्हाटसअप्प वर माहिती पाठविली जाते ते आपण ग्रुपवर पाहात नसेल तर काय सवलती आहेत हे कळणार नाही, दिव्यांग वृध्द निराधार यांना चरी येऊन माहिति देनार नसल्याने व आपणास वाचता येत नसल्यामुळे दिलेली माहिती सर्व सामान्य दिव्यांग बांधवाना कळावी म्हणून यु ट्युब वर चॅनलवर व्हिडिओ ची लिंक पाठवली जाते पण ते पन न पाहिले तर सवलती हक्का पासुन अनेक दिव्यांग वंचित राहातात त्यासाठी दिलेली लिंक पुर्ण पहा व जास्तीत जास्त शेअर करुन दिव्यांगापर्येंत माहीती पाठवावी व परोपकार करावा. आपल्या हक्कासाठी आपण सर्वांनी नेहमी संघटितपणे संघर्षात सहभागी झाल्यामुळे मला ३८ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते आपल्या सर्वाचे श्रेय आहे. तुम्ही सुध्दा आम्हा त्रिमूर्ती दिव्यांग जन्म अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा केला असेच प्रेम आपुलकी कायम राहो सर्वानी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, , प्रेमसिंग चव्हाण, उमेश भगत राजेंद्र सुकळकर हेमसिंग आडे, अरविंद राठोड,रेवा राठोड,नामदेव लोट, राजु कांबळे, शुभम शेरकुरवार,सुनिल पवार,सागर नरवाडे, सुधाकरराव खराटे, वनिता पेटकुले,सुशिला तोडसाम,पुष्पा कलाने, सुमनबाई हंगवणे,प्रविणा मोरे,लता राठोड,रूक्सार अजगर, जयश्री बनसोडे, ईत्यादी मान्यवर तालुका पदाधिकारी तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वाना जेवणाची व्यवस्था केली होती माहुर तालुक्यातील शेकडो दिव्यांग उपस्थित होते असे प्रसिद्धि पत्रक माहुर ता. अध्यक्ष उमेश भगत यानी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 3 4 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे