“आपली व्यक्ती आपली शाळा” पालक वर्गात वातावरण आनंदाचे!
जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास सार्थ करू : नरसू पाटील

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या साई संस्था (ट्रस्ट) डोंबिवली यांच्या शैक्षणिक संकुलाकडे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षा पासून जेएनपीए मराठी मध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोन्ही विद्यालयाचा कारभार आत्ता साई संस्थेच्या हातात आला असल्यामुळे परिसरांतील पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून उरण परिसरांतून जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि या संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या साईसंस्था (ट्रस्ट) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे मराठी, गुजराथी, इंग्रजी मध्यमाच्या बरोबरीने गत वर्षी आणखीन एक स्कूल सुरु केले आहे. संस्था गेली १८ वर्षा पेक्षा अधिक काळ कार्यरत आहे,तर रायगड-माणगाव येथे गेली २४ वर्षा पेक्षा अधिक काळ इंग्रजी माध्यमाचे स्कूल कार्यरत आहे,या सर्व शैक्षणिक वर्षात या सर्व विद्यालयाने आपल्या शालांत परीक्षेच्या १०० % टक्के निकाल लाऊन निकालाची यशस्वी परंपरा आजही राखून ठेवली आहे.मागील चार वर्षात संस्थेच्या वतीने उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल व बरोबरीने कोल्हापूर गडहिंग्ल्ज येथे इ.बी.गडकरी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून गत वर्षी नरसू पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओ थेरपी या आणखी एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश या साई संस्थेच्या शैक्षणिक संकुलात झालेला आहे. साई संस्था(ट्रस्ट)ने शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असतानाच या सर्व शैक्षणिक बाबीची देशांतील नंबर वन असणाऱ्या जेएनपीए प्रशासनाने दखल घेत प्रकल्पग्रस्थ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्दात हेतू विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन उरण येथील जेएनपीए वसाहत संकुलात असणाऱ्या जेएनपीए विद्यालयाच्या मराठी माध्यमासह यंदाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण देण्याची धुरा साई संस्थेवर पासून टाकली आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना साईस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील म्हणाले की मी स्वतः शिक्षक असल्याने मला शैक्षणिक क्षेत्राची चांगली जाण आहे.जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि प्रशासनाने संस्थेवर विश्वास दाखून शिक्षणाची मोठी जबाबदारी माझ्या संस्थेवर इतकेच नाही तर शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पूर्व संध्येला मराठी मध्यमा बरोबरच इंग्रजी माध्यमाची जबाबदारी ही सोपविली आहे. तीपूर्ण करण्यास मी व संस्थाचे सर्व सदस्य, माझा सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी कटिबद्ध राहून पूर्ण करू, येथील बहुसंख्य विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्थ आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पीएपीची सवलत मिळेल,साई संस्थेच्या वतीनेचालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही प्रकारे फी वाढ होणार नाही.विशेष म्हणजे सरकारकडून अनुदान मिळविण्या साठी जेएनपीए प्रशासनाने संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे शिक्षकांच्या वेतना मध्येही फरक पडेल व सर्व शिक्षक कायम स्वरूपी सुरक्षित राहतील त्याचप्रमाणे सरकारच्या निकषानूसार विध्यार्थ्यानाही मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील,आत्ता आपलाच कुटुंबांतील एक व्यक्ती आपलीच शाळा चालवीत आहे ही पालकांची भावना असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पासून सुरक्षते पर्यंतचे प्रश्न सुटलेआहेत”आपलीव्यक्ती आपली शाळा”हे ब्रीदवाक्य घेऊन पालक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मी वाचन बद्ध राहील असे साई संस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सांगितले.




