pub-7425537887339079
ब्रेकिंग

जीवरेखा धरण कोरडेठाक; धरणातील सुपीक गाळ शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, टेंभुर्णी परिसरात घेण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती,

एका टिप्परसाठी अडीच हजारांचा भुर्दंड; वाहतुकीचा इंधन खर्च देण्याची मागणी

0 5 3 7 3 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे असलेले अकोला देव येथील जीवरेखा धरण सध्या कोरडेठाक पडले आहे. ६.८९ दलघमी क्षमता असलेले हे धरण दुष्काळामुळे यंदा नोव्हेंबर महिन्यातच कोरडे पडले आहे. दरम्यान, धरण कोरडे पडल्याने धरणातील गाळ शेतात टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून सध्या मोठ्या प्रमाणात धरणातून गाळ उपसा सुरू आहे. यासाठी शासनाने वाहतूक इंधन खर्च द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यापूर्वी सन २०१२ च्या दुष्काळात धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रथमच धरण कोरडे पडल्याने त्यात सद्यस्थितीत गाळाचा मोठा थर साचलेला आहे. या गाळामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे यावर्षी धरणातून गाळ काढण्याला पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या शेतकरी स्वखर्चाने हा गाळ आपल्या शेतात नेऊन टाकत आहेत. त्यासाठी एका टिप्परसाठी शेतकऱ्यांना दोन ते अडीच हजार रुपये वाहतूक खर्च येत आहे.

२०१२ मध्ये संस्थांचा होता पुढाकार

सन २०१२ च्या दुष्काळात नाम फाउंडेशनसह अनेक सेवाभावी संस्था धरणातून गाळ काढण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. त्यावेळी

अकोला देव येथील जीवरेखा धरण परिसरातून सध्या शेतात गाळ टाकण्याला शेतकरी पसंती देत आहेत.
___________________
चौकट :-
वाहतूक खर्चाची शासनाने तरतूद करावी

“सध्या एका टिप्परसाठी शेतकऱ्यांना दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुष्काळामुळे हा खर्च परवडणारा नाही. शासनाने वाहतुकीसाठी इंधन खर्चाची तरतूद करावी, जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांनाही गाळ शेतात टाकणे सोपे होईल.”
गणेश धनवाई
– शेतकरी,
___________________
चौकट :-

शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी

“यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी येणारा खर्च महसूल किंवा कृषी विभागाने द्यावा. शेतकरी पुरता कंगाल झाला असून त्यांना मदत देऊन शेतीसाठी शासकीय योजना राबवाव्यात.” – विश्वनाथ सांगुळे, शेतकरी
___________________
घाटंजी (जि. यवतमाळ) येथील दिलासा फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख तीस हजार ट्रॉली गाळ उपसा करण्यात आला होता. तसेच तीन ठिकाणी डोह मॉडेलही

बांधण्यात आले होते. यावर्षी मात्र अद्याप कुठल्याही सामाजिक संस्थेने गाळ काढण्यासाठी पुढाकार न घेतल्याने शेतकऱ्यांना स्वखर्चाने हा गाळ काढावा लागत आहे. बरोबरच टेंभुर्णी व टेंभुर्णी परिस्थिती गावांना पिण्याच्या पाण्यात चा पुरवठा या तलावाच्या धरण क्षेत्रातून होत असतो. जेवला का धरण कोरडे टाक झाल्याने पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आता जाणवत आहे. याकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. टेंभुर्णी ला पूर्णाच्या बॅकवॉटर मधून पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे पण ती पूर्ण न झाल्याने तोही प्रश्न गंभीर होण्याच्या मार्गावर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 3 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे