pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबादमध्ये महागाईविरोधात काँग्रेसचा बैलगाडीसह मोर्चा कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या धोरणांचा निषेध; तहसील कार्यालयावर धडक देत दिले निवेदन

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 3

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी जाफ्राबाद येथे काँग्रेसच्या वतीने बैलगाडीसह भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमतींविरोधात आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. हा मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील वाकडे, नेते सुरेश गवळी, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आणि तालुकाध्यक्ष अजय बनकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चामध्ये पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. करत बैलगाडीसह निघालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले असून इंधन, गॅस, डाळी आणि तेलाच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारने तातडीने उपाययोजना करून महागाईवर नियंत्रण आणावे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. महागाई रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे