pub-7425537887339079
ब्रेकिंग

राष्ट्रीय सरीसृप जागृती दिन निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे विशेष चर्चासत्र संपन्न!….

0 4 9 7 1 6
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर, ता. उरण, जि. रायगड-महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय सरीसृप जागृती दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र, कोप्रोली येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्प ओळख, सर्पदंश आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर अत्यंत माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव रक्षण करत असतानाच सर्पदंश रुग्णांना S.A.T.(Snakebite Action Team-सर्पदंश कृती दल) कशी मदत करते  याची माहिती दिली.
ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात भातशेतीची कामे वेगाने सुरू असतात. नेमक्या याच काळात शेतात सर्पदंशाच्या घटना घडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना घ्यावयाची खबरदारी आणि दुर्दैवाने सर्पदंश झाल्यास तत्काळ कोणत्या शास्त्रीय उपाययोजना कराव्यात,याबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सत्रादरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
सत्रात सर्पदंशाव्यतिरिक्त सध्याच्या काळात पाणी टंचाई व पाण्याचा योग्य वापर या विषयावरही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात  एकूण १०१ कर्मचाऱ्यांची उपस्थिती  लाभली. यात (​तालुका आरोग्य अधिकारी)​आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य सहाय्यक-२६
आशा वर्कर्स (ASHA Workers)-७५ उपस्थित होत्या.
     ​फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) कडून जनजागृती आणि निसर्ग संवर्धनाचा हा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला.जयवंत रामदास ठाकूर(संस्थापक-अध्यक्ष, फ्रेंड्स ऑफ नेचर),राकेश  सुरेश शिंदे(फ्रेंड्स ऑफ नेचर)यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वंदन पाटील व डॉ.सुनिधी यांनी सहकार्य केले
आपत्कालीन क्र.9594969747
                      ​8600557387
येथे नागरिकांनी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे