pub-7425537887339079
ब्रेकिंग

21 जून रोजी जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने रविवार, दि. 21 जून, 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सामूहिक योग व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, योग संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने सन 2014 मध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हास्तरीय योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, क्रीडा भारती, विविध योग संस्था, नेहरू युवा केंद्र, स्काऊट-गाईड, महाविद्यालये व शाळा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकामध्ये अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, क्रीडा संघटक, विद्यार्थी, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी पांढरा ट्रॅकसूट अथवा आरामदायी पोशाख परिधान करावा. तसेच स्वतःसोबत योग मॅट किंवा सतरंजी, पिण्याच्या पाण्याची बाटली आणि टोपीसह आवश्यक साहित्य आणावे, असेही आयोजकांनी कळविले आहे. योगाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ करण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम (मो. 8975333594), आशीष जोगदंड (मो. 8888346828), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (मो. 9850333326) तसेच क्रीडा अधिकारी आरती चिलवट (मो. 7758863991) यांच्याशी संपर्क साधता येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे