pub-7425537887339079

Day: November 5, 2026

  • ब्रेकिंग

    तांबेकर सरांचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करताना झाडे जगवा हा संदेश

    जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5 टेंभुर्णी येथील प्रसिद्ध कवी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवेला वाहून घेणाऱ्या, साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लेखक म्हणून ज्यांच्या हातात…

    Read More »
  • ब्रेकिंग

    उरणचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आय टी विभागप्रमुखपदी पदोन्नती

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5 रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एचओसी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान…

    Read More »
  • ब्रेकिंग

    अखिला मेमोरियल ट्रस्टच्या वतीने रानसई मार्गाचीवाडी व सागाचीवाडीवरील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5 प्रत्येक माणसाच्या जीवनात जसा आनंद हा काही काळापुरता  क्षणभंगूर वेळेचा सोबती असतो तसंच दुःख सुद्धा  चिरकाल टिकणारं नसतं.…

    Read More »
  • ब्रेकिंग

    शेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.    

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5                      शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस ऍड शेखर पाटील…

    Read More »
  • ब्रेकिंग

    डी आर टी ए सी एफ एस कॉनकोर कंपनीच्या गेट समोर १११ कामगारांचे काम बंद आंदोलन.

     उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5 मे. सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स या कंत्राटदारामार्फत डी.आर.टी.ए सी.एफ. एस, कॉनकोर, द्रोणागिरी,पागोटे उरण येथे कार्यरत असलेल्या १११ कामगारांचे…

    Read More »
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीच्या रकमेचा चौथा हप्ता जमा 

    जालना/प्रतिनिधी,दि.5  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दि. ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या व दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महाआयटीची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर जिल्ह्यातील बँकांनी एकूण १,९९,५२५ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करून आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी ९९,३७१ पात्र लाभार्थ्यांना यापूर्वी कर्जमुक्तीची रक्कम रु. ७५८.२३ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. दि. ०४ नोव्हेंबर, २०२६ रोजी सदर योजनेच्या महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करून आधार प्रमाणिकरण केलेल्या ३९,९८१ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. ३५३.५२ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. अशी एकूण चार हप्त्यांमध्ये आधार प्रमाणिकरण केलेल्या १,३९,३५२ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. १,१११.७५ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. जालन्याच्या एकूण ८,७७९ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. २४.२७ कोटी तर इतर राष्ट्रीयकृत / खाजगी / व्यापारी / ग्रामीण बँकांचे १,३०,५७३ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम रु. १०८७.४८ कोटी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या चार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून त्यात जालना जिल्ह्यातील एकूण १,७४,२५७ पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी १,४६,१९० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले असून, अद्यापही २८,०७६ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण केलेले नाही. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतरच त्यांची कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सदर यादीतील शेतकऱ्यांनी यादीतील त्यांचा विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, अंगठा स्कॅन / फिंगर आयडी इ. कागदपत्रे घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले नाही त्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आधार स्कॅन / फिंगर आयडी ची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था विष्णु रोडगे यांनी केले आहे.

    Read More »
  • मुख्यमंत्री मत्सयसंपदा योजना अंतर्गत 24 योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्चाचे आवाहन 

    जालना/प्रतिनिधी,दि.5 राज्यातील मच्छिमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यावसायिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने डिजिटल सेवेचे नवे दालन खुले केले आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना (CMMSY) राबविण्यात येत असुन विभागाच्या 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी आता महाडीबीटी 2.0 प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दि. 28 ऑक्टोबर 2026, बुधवार रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाडीबीटी 2.0 प्रणाली या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध लाभार्थीभिमुख योजनांची अंमलबजावणी आता अधिक सुलभ, गतिमान, पारदर्शक व पुर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हा वार्षिक योजनांचा लाभ थेट मत्स्यव्यावसायिकांपर्यंत सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने पोहोचविणे हा उद्देश असुन लाभार्थ्यांकरीता 24 योजना थेट ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता येणार असुन लाभार्थ्यांना अनुदान थेट आधार-संलग्न बॅंक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ होणे, कागदपत्रांची संख्या कमी होणे आणि सेवांचा जलद निपटारा होणे यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे. ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ  महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbt2.maharashtra.gov.in/othersया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

    Read More »
  • ब्रेकिंग

    दुष्काळात फटाके फोडून आनंद व्यक्त करणे टाळा! तोच पैसा शेतकऱ्यांच्या गाई-गुरांना चाऱ्यासाठी मदत म्हणून द्या!

    जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5 यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. शेतात पाणी नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण आहे. अशा परिस्थितीत फटाके…

    Read More »
  • ब्रेकिंग

     दिवाळीच्या आनंदासोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन; खानापूर शाळेत शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

    जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5 खानापूर येथील प्राथमिक शाळेत दिवाळी सणाचे औचित्य साधून शालेय समितीचे अध्यक्ष संदीप पाटील शेळके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक…

    Read More »
  • ब्रेकिंग

    Rj & संजीवनी क्लासेस टेंभुर्णी येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

    जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5 टेंभुर्णी ता जाफराबाद येथील Rj & संजीवनी क्लासेस येथे वर्ग 10 वी मध्ये प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या…

    Read More »
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे