pub-7425537887339079
ब्रेकिंग

पावसाळ्यात जासई येथे पावसामुळे येतो महापुर

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण तालुक्यातील नॅशनल हायवे प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून पावसाळा सुरु होण्या आधी नाले सफाई करावी अशी मागणी केली आसता नॅशनल हायवे प्रशासन या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. वारंवार पत्र व्यवहार करून व प्रत्यक्ष कार्यालयाला भेटी देवून सुध्दा नॅशनल हायवे प्रशासन आजूनही झोपेचे सोंग केल्याचे नाटक करत आहे. ब-याच वेळेला जासई लगत आसलेले नॅशनल हायवे येथे पावसाळ्या मध्ये पाणी भरून ४ महिने येण्याजाण्याचा मार्ग बंद आसतो हे नॅशनल हायवे प्रशासनाला माहित असून तेथिल अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात व नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करतात. दिनांक १८/०५/२०२६ रोजी सरपंच या नात्याने त्यांनी कार्यालयाला भेट दिली आसता असे निर्दशनास आले की नॅशनल हायवे प्रशासनाने नाले सफाई करण्याकरीता आजूनही कोणताही कॉन्ट्रक्टर नेमला नाही त्यामुळे येणा-या पावसाळ्यामध्ये नॅशनल हायवेच्या रस्त्यांवर नदिचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे जासई गावातील नागरीकांसाठी नॅशनल हायवे प्रशासनाने बोटीची व्यवस्था करावी अशी मागणी सरपंच संतोष घरत यांनी नॅशनल हायवे प्रशासनाकडे केली आहे.गेल्या वर्षी रस्त्यावर व नाले गटारे मध्ये भरपूर प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने अनेक ग्रामस्थांचे टू व्हीलर, फोर व्हीलर वाहनांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तर अनेक दुकान व घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले होते.गेल्या वर्षी सारखी परिस्थिती पुन्हा उदभवू नये यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट चौकट :- नॅशनल हायवे प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील वेळेत गटारे साफ होत नसल्याने नागरिकांना, जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदाही साफसफाई न झाल्याने अनेक समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे नॅशनल हायवे प्रशासनाने त्वरित नाले साफसफाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा. – संतोष घरत, सरपंच,जासई ग्रामपंचायत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे