pub-7425537887339079
ब्रेकिंग

कर्जत साय झाडांच्या कत्तली विरोधात विद्रोही कवी गरजले.

0 5 2 7 5 4
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
कर्जत साय डोंगरात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल टोरांटो कंपनी अर्थात  सरकारनेच केली आहे हे सर्वत्र बोलले जात असल्याने त्या विरोधात कोमसाप रायगड यांनी पाली येथे साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर कविसमेलन पाली येथे संपन्न केले.संमेलनाची सुरुवात
  ” अरं सरकारा ,दुष्ट सरकारा
     तू भस्मासुर हाय ‘” या पहिल्याच आगरी कवितेने दाद मिळाल्यानंतर संपूर्ण कविसंमेलन विद्रोही कवींनी
सरकार विरोधात वातावरण तापवले. जनार्दन सटाणे यांच्या जोशातील सूत्रसंचालनाने
विद्रोहाची उंची वाढविली.
       कॉमरेड गोपाळ शेळके यांनी आपल्या कवितेतून सरकारच्या पापी कृत्यांचा पाढा जहरी शब्दात वाचला. कवयित्री अक्षता गोसावी, नरेश पाटील,वसंत मोहिते,
रामदास गायधने,भारती ढकवळ, ॲड संतोष जोहेकर
ॲड.कल्पना वाळिंजे, सटाणे
जनार्दन,अनंत भोईर,दामोदर गायकवाड,शाहीर अनंत पाटील,महेश बार्शी,मारुती बागडे गुरुजी सुरेश पडघेकर इत्यादींनी हे कवी संमेलन गाजवल्याने अखिल भारतीय कम्युनिस्ट रायगड जिल्ह्याने मोठ्या उपस्थितीने आणि जोरदार घोषणांनी आंदोलनाने सारा परिसर दुमदुमून टाकले.
             कॉम.प्रकाश रेड्डी, महाराष्ट्राचे  ज्येष्ठ गझलकार अप्पा ठाकूर,प्राचार्य अजित मगदूम,सुभाष  लानदे, सामाजिक कार्यकर्ते
प्रदीप मुंबईकर, ॲड सतीश शेळके,समाजसेविका वृषाली मगदूम,साहित्यिक मुनघाटे वाशी इत्यादींनी कविसंमेलनाला जोश भरला. यानंतर सर्व कवी आणि कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी घोषणा देत सायच्या जंगलात वृक्ष तोडीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.प्रास्ताविक बंडखोर गोपाल शेळके,तर आभार संतोष जोहेकर यांनी मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 7 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे