pub-7425537887339079
ब्रेकिंग

सेठ एकनाथ भगवानदास काबरा विद्यालयात आषाढी वारीनिमित्त दिंडी उत्साहात

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.24

सेठ एकनाथ भगवानदास काबरा मराठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या दिंडीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ अशा नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी नामस्मरण करत दिंडीचा आनंद लुटला. मुला-मुलींनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन पारंपरिक पद्धतीने वारीचे दर्शन घडविले. यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसमवेत टाळ-मृदंगाच्या गजरात फुगडी खेळत व भक्तिगीतांवर सहभाग घेतला. गावातील ज्येष्ठ वारकरी व भजनी मंडळानेही या दिंडीत सहभागी होत अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, आषाढी वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व तसेच भारतीय संस्कृतीतील भक्ती, समता आणि एकात्मतेचे संस्कार अनुभवता आले. विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे