pub-7425537887339079
ब्रेकिंग

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम 

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.29 

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे बुधवार, दि. 30 एप्रिल, 2026 रोजी दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण्. सायंकाळी 4.10  ते सायंकाळी 5.25 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित खरीप हंगाम 2026 पुर्व तयारी आढावा बैठक/ पाणी टंचाई आढावा बैठक/जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 6.30 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात  जनता दरबार (अभ्यंगतांच्या भेटी व नागरिकांशी संवाद), सायंकाळी 6.35 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.

 तसेच शुक्रवार, दि. 1 मे, 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण व विविध कार्यक्रम तसेच जिल्हा पोलीस दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण  सोहळयास उपस्थिती. तसेच सकाळी 9.00 ते 10.45 वाजता मोतीबाग चौपाटी (बदनापूर रोड) कडे प्रयाण, दिव्यांग केंद्राचे लोकर्पण स्थळ – जिल्हा रुग्णालय शेजारी. सकाळी 11.00 वाजता अग्रेसन भवन येथे आयोजित “रायझिंग जालना”या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता दैनिक दिव्य मराठी ग्रुपच्या वतीने आयोजित जालना पोलीस सन्मान सोहळयास उपस्थिती स्थळ हॉटेल अतिथी, मंठा रोड दुपारी 2.15 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे