pub-7425537887339079
ब्रेकिंग

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क, सारडे येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
उरण तालुक्यातील सारडे गावातील कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काही वर्षांपूर्वी या डोंगरावर एकही झाड नव्हते. मात्र, सारडे विकास मंचाच्या अथक प्रयत्नांतून आज येथे हजारो वृक्ष दिमाखात डोलताना दिसत आहेत. या हरित उपक्रमामुळे ऑक्सिजन पार्क निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले असून, दररोज अनेक नागरिक येथे भेट देत आहेत.
वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त निशा प्रितम म्हात्रे (कोप्रोली) यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्कमध्ये सातत्याने कार्य करणाऱ्या १२ महिला मजुरांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
याच कार्यक्रमात बॅचलर ऑफ आर्ट्स इन कलिनरी आर्ट्स हे शिक्षण पूर्ण करून दुबई, चीन, मालदीव, श्रीलंका, कतार व ओमान या सहा देशांमध्ये कार्याचा अनुभव घेऊन परतलेल्या शुभम प्रमोद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उरण पूर्व विभागात २४ तास ॲम्ब्युलन्स सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम गवंडी, पोलीस हवालदार विजय पाटील (तळोजा), रमेश घुगरे, स्वप्निल म्हात्रे, माजी सरपंच प्रसाद पाटील (वशेणी), सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, निवास गावंड (अध्यक्ष, सुयश क्लासेस, आवरे),  निशा प्रितम म्हात्रे, प्रितम म्हात्रे, प्रा. अनिल नायडू, प्रशांत म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, एमडीएस हॉटेलचे मालक नितीन म्हात्रे, गणेश भोईर, कृषी मित्र प्रकाश माळी, रोशन घरत, गजानन ठाकूर, कार्यक्रमाचे निवेदक चेतन पाटील, अजित पाटील, हितेश म्हात्रे, मुकेश म्हात्रे, विनोद पाटील, प्रमोद पाटील, मंगेश पाटील, अतुल पाटील, विनायक गावंड, भावार्थ गावंड, नरदास कोठेकर, रामनाथ पाटील, गणेश पाटील, धनेश गावंड, सुमित पाटील, शुभम पाटील, योगेश माळी, मयूर माळी, सायली नवघरकर, रियांश, आध्या, गौरंग, ऋत्विक, सौरभ, सम्राट, श्री राधाकृष्ण महिला ग्रुप, सुलक्षणा पाटील, भगवती पाटील, कविता गावंड, मंदा ताई, पुष्पा ताई, कल्पना ताई, अर्चना ताई, जागृती ताई, जयश्री ताई, कलावती पाटील, गीता पाटील, कोमल पाटील, सौम्या, प्रिन्स, वेदिका, रुंजल तसेच सारडे विकास मंचाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था अजित पाटील यांच्या वतीने करण्यात आली, तर चहाची व्यवस्था प्रकाश माळी यांनी केली. यावेळी सारडे विकास मंचाचे सदस्य आणि अनेक निसर्गप्रेमींनी रोप भेट देऊन वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी निवेदन चेतन पाटील यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम गवंडी यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “आपण जे काम करतो ते चुकीचे आहे का? ते वाईट आहे का? ते पाप आहे का? ते खोटे आहे का? आणि त्या कामामुळे कुणाला त्रास तर होत नाही ना? जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेल, तर समाजासाठी चांगले कार्य करत राहा.” त्यांच्या या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
निशा प्रितम म्हात्रे यांनीही महिला मजुरांच्या जिद्दीचे, परिश्रमाचे आणि सेवाभावाचे कौतुक केले. उन्हाळा, पावसाळा किंवा वारा यांची पर्वा न करता त्या स्वतःच्या घरचे काम समजून ऑक्सिजन पार्कची सेवा करत असल्याबद्दल त्यांनी त्यांना सलाम केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, महिला मजूर, स्वयंसेवक, निसर्गप्रेमी आणि नागरिकांचे सारडे विकास मंचाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे अत्यंत यशस्वी ठरला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे