इंदेवाडी पाणी टाकी ते गोकुळधाम सोसायटी रस्त्याचे उद्घाटन संपन्न!

जालना/प्रतिनिधी, दि.12
विधानसभेचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने इंदेवाडी पाणी टाकी ते गोकुळधाम सोसायटी पर्यंतच्या डीपी रोडसाठी 2 कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून विविध तांत्रिक अडचणीवर मात करून अखेर या रोडच्या कामास सुरुवात झाली आहे.सदर रोडचे भूमिपूजन आज दिनांक 12 रोजी आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी इंदेवाडी परिसरातील वसाहतींसाठी अंतर्गत नाल्या,अंतर्गत रोड तसेच इतर मूलभूत सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आमदार खोतकर यांनी दिली. सदर रोडचे काम दर्जेदार करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराला अर्जुन भाऊंनी कडक शब्दात सांगितले तसेच परिसरातील नागरिकांनीही सदर कामावर बारकाईने लक्ष ठेवून काम दर्जेदार करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्री पंडित दादा भुतेकर , शिवसेना जालना शहर प्रमुख श्री विष्णू भाऊ पाचफुले, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री भाऊसाहेबजी घुगे, समाजसेवक श्री किशोर भाऊ पांगारकर, माजी उपनगराध्यक्ष श्री सुनील बापू आर्दड , नगरसेविका श्रीमती दर्शनाताई झोल-खोतकर व सौ.उषाताई पांगारकर, श्री अमोल भाऊ ठाकूर , श्री निखिल भाऊ पगारे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुमित भाऊ वाघमारे, समाजसेवक फकीरा वाघ ,कॉन्ट्रॅक्टर श्री. सुधाकर पवार यासह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल कोल्हे सर, प्रास्ताविक श्री ज्ञानदेव कांगणे सर तसेच आभार प्रदर्शन श्री प्रमोद पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सुखदेव भुंबर. विजय इंगळे, श्रीमंत कापसे,जगू बरंडे ,विष्णू एडके गणेश राठोड ,प्रणव जाधव, नवनाथ डावकर, बजरंग मुंडे, विष्णू मानकर ,गीताराम डबडे, रामेश्वर गिरी,विजय गिरी, ज्ञानेश्वर काकडे,औदुंबर मातने, दीपक खांडेभराड, राहुल धांडे, नागेश एकशिंगे, फकीरा वाघ, माया आठवले, दळवी साहेब, पाराजी जाधव, गिरीधर वास्कर, सुरेश खोतकर, विष्णू भुंबर अभया तोटे, अरगडे साहेब, राजेंद्र मुळे, उधाण टेलर, अजय परकाळे,मुकेश मुंडे, कन्हेलाल शर्मा, अंबादास आरगडे, सतीश शिंदे, बाबुराव भुतेकर,सुरेश मदन ,श्रीमंतराव कापसे, विजयराव कदम, यासह परिसरातील ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.



