pub-7425537887339079
ब्रेकिंग

 जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

0 4 2 1 0 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीस वैधमापनचे आर.डी. दराडे, महावितरणचे समाधान म्हस्के, एस.बी. मठपती, बीएसएनएलचे पी.एस. इंगळे, अन्न व औषध विभागाचे अश्विनी तांबे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण पवार, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे राजकुमार मुंडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ङ. एस. दिवटे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले की, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणीबाबत उपाय योजना करणे आवश्यक आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमातून ग्राहक जनजागृती करावी. ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर करावे. यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या तक्रारी मांडल्या यामध्ये जिल्ह्यातील काही भागात अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) असल्याची तक्रारी आहेत. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील औषध दूकाने आणि बोगस डॉक्टरांचा शोध घेवून कार्यवाही करावी. तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात विक्रेते दगडाचे माप वापरतात, अशा विक्रेत्यांची तपासणी करुन वैधमापन विभागाने कारवाई करावी. तसेच वेळोवेळी टॅक्स भरुन ही जालना मार्केट कमिटी परिसरातील स्वच्छता होत नाही. मार्केट यार्ड महावितरणने स्मार्ट मिटर संबंधी प्राप्त तक्रारीचे निवारण करुन, नागरिकांना स्मार्ट मिटर बद्दल सविस्तर माहिती द्यावी. तसेच ग्राहकांनी महावितरण संबंधधी तक्रारी 1912 आणि 18002123435 यावर नोंदवावी. आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांनी यावेळी दिल्या. बैठकीच्या सुरुवातीस सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. दिवटे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच jalna.nic.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 1 0 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे