उंचाडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी ; मान्यवरांची मोठी उपस्थिती

हदगाव/प्रतिनिधी,दि.26
उंचाडा येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उंचाडा येथे मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबुरावजी कदम साहेब, मा. रामचंद्र भराडे, मा. गुणवंत काळे सर, मा. के. डी. पवार, मा. राम गायकवाड, मा. शिवाजीराव मात्रे, मा. शाहीर पारडे संतोष पवार, संतोष वाघमारे, गोलू पवार, संजय साठे, किशन कांबळे
हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार बाबुराव कदम साहेब व सरपंच आसराबाई डोके यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व क्रांतिकारी कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच सौ. आसराबाई डोके, उपसरपंच दिनकर चव्हाण, जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष विलासराव चव्हाण,पोलिस पाटील गजानन चव्हाण, प्रभाकर देशमुख, तुकारामजी चव्हाण,माजी उपसरपंच बालाजी,चव्हाण, बालु पाटील उंचाडकर,बाबुराव चव्हाण, शेषराव चव्हाण,पप्पू चव्हाण, अरुण पाटील,बाळू पुयड, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




