संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि 17
टेंभूर्णी ता जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे शिक्षक पालक मेळावा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रघुराम साहेब उखर्डे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार श्री बाळाजी शेवाळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य प्रा सतीश जाधव यांनी केले. मेळाव्यादरम्यान अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबाद समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रगती पत्रकाबरोबर मेडल्स देऊन त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे गुणगौरव करण्यात आला. पुढील शैक्षणिक वर्षात अमलात आणण्याच्या उपाययोजना तसेच विद्यार्थी प्रगतीबाबाद विचारविनिमय करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना श्री रघुराम साहेब यांनी पालकांनी आपल्या पाल्याला वेळ देऊन त्याच्याशी हितगुज करावे जेणे करून विद्यार्थी मोबाईल पासून दूर राहतील असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शीला जाधव व हिना शेख यांनी विशेष प्रयत्न केले.




