pub-7425537887339079
ब्रेकिंग

दुष्काळात फटाके फोडून आनंद व्यक्त करणे टाळा! तोच पैसा शेतकऱ्यांच्या गाई-गुरांना चाऱ्यासाठी मदत म्हणून द्या!

0 5 2 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5

यंदा दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. शेतात पाणी नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण आहे. अशा परिस्थितीत फटाके फोडून आनंद व्यक्त करणे व हवा प्रदूषित करणे योग्य आहे का? याचा सर्वांनी सारासार विचार करावा.

फटाक्याचे दुष्परिणाम :
१. हवेचे प्रदूषण : फटाक्याच्या धुरामुळे हवा जड होते, डोळे जळजळतात, श्वास घ्यायला त्रास होतो.
२. लहान मुले, वृद्ध, दम्याचे व हृदयाचे रुग्ण, गरोदर महिला यांना धूर व आवाजामुळे खूप त्रास होतो.
३. मोठ्या आवाजामुळे कानाला धोका, मुलांना भीती, झोप व अभ्यासावर परिणाम होतो.
४. ठिणगीमुळे घरावर, गंजीवर, चाऱ्यावर आग लागण्याचा धोका आहे.
५. आवाजाने गाय, म्हैस, शेळ्या घाबरतात, दूध देत नाहीत, पळत सुटतात.
६. फटाक्यांचा कचरा शेतात, विहिरीत पडून जमीन व पाणी खराब होते.

शेतकऱ्यांना मदत करण्याची कळकळीची विनंती :
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. आज त्याचे पीक जळून गेले आहे, हातात पैसा नाही, कर्ज डोक्यावर आहे. अशा वेळी त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

मी सर्वांना हात जोडून विनंती करतो – यंदा फटाक्यावर पैसा खर्च करू नका. तोच पैसा शेतकऱ्यांच्या गाई-गुरांना चाऱ्यासाठी, गरजू कुटुंबाला धान्यासाठी द्या. तुमचे ५००, १०००, २००० रुपये एखाद्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरतील.

शेतकऱ्याने कधी हात पसरला नाही. तो स्वाभिमानी आहे. पण आज निसर्गाने त्याला हतबल केले आहे. आपण आधार दिला तर तो पुन्हा उभा राहील, पुन्हा शेतात सोने पिकवेल.

सण हा आनंदासाठी असतो. पण खरा आनंद हा दुसऱ्याला मदत करण्यात आहे. दुष्काळात एकमेकांना आधार देऊया, धुरात पैसा घालवू नका.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे