pub-7425537887339079
ब्रेकिंग

परंपरा यशाची, जिद्द निकालाची! जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे चा दहावीचा निकाल सलग १०० टक्के!

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

‘विद्वान सर्वत्र पूजते’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलने आपला यशाचा आलेख यावर्षीही उंचावत ठेवला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यालयाने स्थापनेपासूनची ‘शतप्रतिशत’ निकालाची परंपरा यंदाही मोठ्या अभिमानाने कायम राखली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची चमक: यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, दोन विद्यार्थिनींनी समान ८२.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा बहुमान विभागून मिळवला आहे. प्रथम क्रमांक (संयुक्त): कु. दिशा उदय म्हात्रे (८२.२०%) आणि कु. श्रुती ऋषिकेश म्हात्रे (८२.२०%) द्वितीय क्रमांक: कु. कार्तिकी भारत पाटील (८०.४०% तृतीय क्रमांक: कु. भक्ती अयोध्या म्हात्रे (७८%) हे विद्यालय म्हणजे स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या शैक्षणिक स्वप्नातून उभे राहिलेले एक मंदिर आहे. आज अशोक ठाकूर नसले तरी, त्यांच्या विचारांचा वारसा या यशाच्या रूपाने जिवंत असल्याचे पाहायला मिळाले. परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व २३ विद्यार्थ्यांनी आपले हे घवघवीत यश साश्रू नयनांनी आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक लाडके स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केले आहे. “सरांनी पाहिलेले स्वप्न आम्ही आमच्या कष्टाने पूर्ण केले,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे अध्यक्ष प्रतीक ठाकूर, खजिनदार वामन ठाकूर , विश्वस्त अलका ठाकूर , सिंधू ठाकूर , आदिनाथ ठाकूर ,प्रसाद ठाकूर, रीना ठाकूर , मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे