pub-7425537887339079
ब्रेकिंग

खानापुर जि.प. शाळेत स्नेहसंमेलन बक्षीस  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.11

खानापूर येथे अतिशय उत्साहात पार पडलेल्या स्नेहसंमेलन सोहळ्यात
खानापूर येथील प्राथमिक शाळेत शालेय समिती,गावातील नागरिक व पालक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जमा झालेल्या सुमारे २९००० रु बक्षीस निधीतून खर्च वजा जाता उर्वरीत रक्कमेतून सर्व विद्यार्थ्यांना काल दिनांक ९ एप्रिल रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मिळाले प्रोत्साहनपर साहित्य
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड देण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल व तारा चौधरी लिखित सचित्र ‘बालमित्र’ पुस्तक तर इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना कंपास पेटीचे वाटप करण्यात आले.
शंभर टक्के उपस्थितीचा गौरव
मागील महिन्यात शाळेत 100% उपस्थिती असलेल्या 11 गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दर्शना गजानन शेळके, गौरी भागवत तळेकर, पायल एकनाथ काकडे, वेदिका विलास क्षीरसागर, श्रुती विश्वास शेळके, वेदिका मारुती शेळके, देवांशी गजानन फदाट, वेदांत महादेव तायडे, दिपाली विठोबा बर्डे, राणी विठ्ठल तायडे व निकिता एकनाथ काकडे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक मोठे रजिस्टर व एक मिक्स वही बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
शाळेसाठी 900 रुपयांचे योगदान
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या प्रगतीसाठी उपस्थित सदस्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. परिसर सफाई व अंगणवाडीतील 5 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी संदीप भानदास शेळके,ऋषिंद्र शेळके,गजानन दिनकर पा.शेळके,मारुती भावसिंग शेळके, गजानन तुकाराम शेळके, विठ्ठल अंबादास तायडे, मंगेश शेळके, कौतिक पाटील तायडे व विकास जगन बर्डे या नऊ सदस्यांनी प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे एकूण 900 रुपयांचे योगदान दिले.
शालेय परिसराबाबत महत्त्वाचा ठराव
यावेळी सर्वानुमते ठराव करण्यात आला की, शालेय परिसरात खाजगी कार्यक्रम फक्त सुट्टीच्या दिवशीच घेता येईल. त्यासाठी शाळेस 1500 रुपयांची पावती योगदान म्हणून द्यावी लागेल व कार्यक्रम संपल्यानंतर परिसर स्वच्छ करून देण्याची जबाबदारी संबंधितांची राहील.
या कार्यक्रमास शालेय समिती सदस्य कौतिक तायडे,ऋषिंद्र शेळके, विकास जगन बर्डे तसेच गावातील शिक्षणप्रेमी संदीप भानदास शेळके,गजानन दिनकर पा.शेळके, मारुती पाटील शेळके, गजानन तुकाराम शेळके, विठ्ठल पाटील तायडे, मंगेश पाटील शेळके, सूर्यकांत पाटील शेजुळ, कृष्णा शेळके,जनार्दन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी अध्यक्ष विश्वास शेळके यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे