pub-7425537887339079
ब्रेकिंग

पेणमध्ये १४ वे राष्ट्रीय वार्षिक कराटे प्रशिक्षण शिबिर २०२६ चे आयोजन

0 5 2 7 5 4
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
मार्शल आर्ट क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे १४ वे वार्षिक राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिर २०२६ चे आयोजन यंदा रायगड जिल्ह्यात करण्यात आले आहे. विजय विकास सामाजिक संस्था (All Style Karate Instructor Association – VVSS) आणि SKSAI महाराष्ट्र यांच्या मुख्य आयोजनातून आणि SKSAI इंटरनॅशनल, SKSAI इंडिया, शोतोकान कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड मिक्स बॉक्सिंग असोसिएशन आणि इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार असून हे शिबिर दि. १२ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्री. बाळलेश्वर फार्म हाऊस, गाव- कामाली, कुंभार्ली, ता. पेण, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता JNPT टाऊनशिप स्टाफ क्लब उरण येथे रिपोर्टिंग ठेवण्यात आले असून तेथून आयोजकांतर्फे अंतर्गत वाहतुकीची सोय करण्यात येणार आहे. या चार दिवसीय निवासी शिबिरात सिनियर मास्टर्सच्या मार्गदर्शनाखाली फुल कॉन्टॅक्ट कराटे, सेमी कॉन्टॅक्ट, ज्युडो, मिक्स बॉक्सिंग, वेपन्स, जुजुत्सू, सिनियर काताज् यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार असून मुलींसाठी विशेष स्व-संरक्षण प्रशिक्षण, प्रशिक्षक प्रशिक्षण आणि मैत्रीपूर्ण स्पर्धा परीक्षाही घेतली जाणार आहे. शिबिरा मध्ये राहण्याची सोय, अंतर्गत वाहतूक, नाश्ता, जेवण, प्रमाणपत्र, स्पर्धा, बक्षिसे, प्रथमोपचार आणि मनोरंजन कार्यक्रमाचा समावेश आहे. NO PAIN – NO GAIN हे या शिबिराचे ब्रीद असून शिस्त, आत्मविश्वास, स्व-संरक्षण, मजबूत मन आणि निरोगी जीवन ही या शिबिराची मुख्य उद्दिष्टे आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज  जमा करणे बंधनकारक असून शिबिरात मोबाईल फोन, धूम्रपान, तंबाखू, गुटखा यांना सक्त मनाई असून संपूर्ण शिस्त पाळणे अनिवार्य आहे. या शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी श्री.विकास भोईर – ९२२२०२२४८८, सौ. प्रगती भोईर – ८७७९५३९६६७, श्री. दिपक घरत – ९९२०३५४३८३, मिलन जाधव – ८३६९३२०२१६ आणि अथर्व घरत – ९३२१५७३४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 7 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे