उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन.
उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार. शाळा, कॉलेज मधील मुले नशेच्या आहारी. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्ती वळत आहेत गुन्हेगारी कडे. व्यसना विरोधात त्वरित कारवाई करण्याची गरज.
उरण तालुक्यात चरस गांजा करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढत असून उरण मध्ये अनेक ठिकाणी खुलेआम पणे नशेचा बाजार सुरु आहे. अनेक ठिकाणी या नशेली पदार्थांची खरेदी विक्री मोठया प्रमाणात सुरु असून या व्यसनाला उरण मधील शाळा, कॉलेज मधील तरुण मुले सर्वाधिक बळी पडत आहेत त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हिच नशा करणारी व्यक्ती पुढे गंभीर गुन्ह्याकडे वळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हा नशेचा बाजार रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
उरण पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जासई येथील पार्किंगमध्ये छापा मारून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणासह त्याचे सेवन करणाऱ्या दोघांना असे एकूण तीन जणांना अटक करीत २ लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उरण तालुक्यातील जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे असलेल्या जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पद अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उरण पोलिसांनी १० एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास छापा मारला. यावेळी तेथे रवींद्र कल्याण शेट्टी (२७), गणेश दत्तू भिडे (२५) व गणेश विनय पाटील (१९) हे तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना आढळले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, गणेश पाटील याच्याकडे ६.३२ ग्रॅम वजनाची हेरॉईनच्या ८५ पुड्या सापडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात अमली पदार्थाची किंमत अंदाजे २,५२,८०० रुपये आहे. या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांनाअटक केल्याची माहिती वपोनि हनिफ मुलाणी यांनी दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी सांगितले.
उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेच्या औषधांची विक्री खरेदी मोठया प्रमाणात होत असून अशा खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती वर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानीं केली आहे.
एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ. साळवे, डॉ. मोठे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
7 hours ago
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन
7 hours ago
शालेय बस-व्हॅनसाठी नवे नियम लागू; सुरक्षा उपाय अनिवार्य 23 ते 30 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई
7 hours ago
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात आयव्हीबीपी संस्थेकडून 1 कोटी लसींचे वितरण
7 hours ago
सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व विद्यार्थी जीवनातच घडते- प्राचार्य डॉ ठक्कर.
7 hours ago
मोरा सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीत आढळला अनोळखी बेवारस इसमांचे मृतदेह.
7 hours ago
खोपटे येथे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मत्स्य बीज वाटप कार्यक्रम संपन्न.
7 hours ago
जंतर मंतर दिल्ली येथिल विद्यार्थ्यावरील अमानुष लाठीमार विरोधात उरण मधे निदर्शने.
7 hours ago
श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण
7 hours ago
जाफ्राबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेबुब खान पठाण