टेंभुर्णीत वारंवार वीज खंडित; अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
“गणेशोत्सवात गावाला अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करा” — ग्रामस्थांची मागणी**
गणेशोत्सव सुरू असतानाच टेंभुर्णी गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतर संबंधित अधिकारी व लाईनमन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.
वीजपुरवठ्याच्या या समस्येबरोबरच संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवरही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. **अधिकारी मुख्यालयाच्या परिसरात न राहता जालना येथून ये-जा करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून, संबंधित अधिकाऱ्याच्या मुख्यालयातील उपस्थितीबाबत महावितरणच्या नियमांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी करावी**, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच, नागरिकांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद न देणे, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तातडीने उपाययोजना न करणे आणि नागरिकांशी उद्धटपणे वागल्याच्या तक्रारींबाबतही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
*अधिकाऱ्याचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा किंवा मोठ्या व्यक्तींचा धाक दाखवला जात असल्याचा दावा केला जात असेल, तर त्याचीही वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. अधिकारी कोणाचाही असो, ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांपेक्षा कोणीही मोठे नाही,”** अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर **संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून, दोष आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्यात यावी**, अशी मागणी टेंभुर्णी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
**आता वरिष्ठ अधिकारी टेंभुर्णीतील या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष __________________चौकट :-एका वृद्ध ग्रामस्थांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी चर्चा करताना सांगितले, टेंभुर्णी च्या समस्या सांगायच्या कुणाला, गावातील राजकीय नेते, अगदी गप्प असतात, त्यांना तर स्वतःच्या गावाचाही विसर पडला की आपण या गावचे नेते आहोत
ते तर कोणाची तरी वाट पाहत असतात ते कोणीतरी येईल आणि आमच्या गावची समस्या सोडवेल, तेही विसरले की गावची समस्या सोडवताना गावातील नेतेमंडळी गावातील समाजसेवक एकत्र येऊन समस्येवर विचार करून सोडवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल याचाही विचार ते करत नाही. गावातील नेते मंडळींना समाजसेवकांना गावातील समस्येचा अगदी विसर पडलेला दिसून येतोय किती समस्या आहेत किती समस्यांना तोंड द्यावे लागते याचा विचार ते कधीच करत नसताना सणासुदीच्या काळात लाईन केव्हाही जाते तेव्हाही येते आणि आमच्या सारख्या वृद्ध माणसांना त्याचा किती त्रास होतो याची साधी कल्पनाही या लोकांना येत नाही हीच सर्वात मोठी समस्या आहे. एक वृद्ध ग्रामस्थ


