pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची शिक्षक कृती समितीची मागणी

0 4 8 3 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.30

जालना : पंचायत समिती जालना येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, नियमबाह्य प्रतिनियुक्त्या, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांचे नियमबाह्य पदभार, शिक्षकांवरील अन्याय तसेच प्रशासनातील निष्काळजीपणा आणि अधिकाराच्या गैरवापराबाबत चौकशी करण्याची मागणी शिक्षक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या सेवा पुस्तिका व प्रशासकीय कामांसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रतिनियुक्तीवर ठेवून शिक्षकांची कामे अडवली जात असल्याचेही समितीने म्हटले आहे.
शिक्षकांचे वेतन रखडल्याचा आरोप
पाचणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षकांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. रजा घेणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात केली जात असल्याचेही समितीने नमूद केले आहे.
कार्यालयातील काही शिक्षक मागील पाच ते सात वर्षांपासून शाळांवर अनुपस्थित राहून केवळ हजेरी पटावर स्वाक्षरी करीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरावर स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून दोषींवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कठोर कारवाई करावी, तसेच शिक्षकांना त्यांची मूळ शाळा/पदावर पाठवावे, अशी मागणी शिक्षक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार असून, संबंधित प्रशासनाची बाजूही महत्त्वाची आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे