pub-7425537887339079
ब्रेकिंग

आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 23

अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग उचलणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी दि. 25 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अर्जासोबत अनुसूचित जमातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत. सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला. विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो. जन्म तारखेचा पुरावा. वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. पालकांचे संमतीपत्रक. दारिद्र्यरेषेखालील असल्यास शिधापत्रिकेची प्रत व अनुक्रमांक आदि कागदपत्रे जोडावयाची आहेत. या योजनेसाठीचे प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर’ येथील शिक्षण विभागात संपर्क साधून आपले अर्ज दि. 25 मे पर्यंत सादर करावेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे