जालना व बदनापुर तालुका जि.प.शिक्षक सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री.रमेश हुशे यांची निवड.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.7
जालना व बदनापुर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी शिक्षक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री. रमेश हुशे यांची निवड करण्यात आली. दिनांक 4 मे 2026, सोमवार रोजी दुपारी 3 वाजता अध्यासी अधिकारी श्री.शरद तनपुरे (जिल्हा उपनिबंधक कार्यालय जालना) यांच्या उपस्थितीत वरील पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न झाली. यावेळी शिक्षक उत्कर्ष पॅनलच्या वतीने श्री रमेश हुशे यांनी उमेदवारी दाखल केली होती. यात 9 विरुद्ध 4 अशा मतांनी त्यांचा विजय होऊन संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. श्री.रमेश हुशे हे शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक शिक्षक नेते श्री.प्र.स.हुशे यांचे पुतने असून जालना हॉस्पीटलचे संचालक डाॅ.प्रदिप हुशे,इंजि.श्री.रविंद्र हुशे आणि सहाय्यक निबंधक,जालना श्री.उमेशचंद्र हुशे यांचे बंधू आहेत. या निवडीबद्दल व्हाईस चेअरमन श्रीमती साधना गिऱ्हे(जैवाळ),खजिनदार श्री. अरुण जाधव, सचिव श्री. संतोष देशपांडे, संचालक सर्वश्री.विकास पोथरे,जगत घुगे,जगन्नाथ शिंदे, सुभाष भडांगे, गणेश भुतेकर, दिनेश एखंडे, सचिन गंगावणे, रघुनाथ वाघमारे, देवेंद्र बारगजे, मधुकर काकडे, संचालिका श्रीमती वैशाली देशमुख तज्ञ संचालक श्री. बबनराव बोरुडे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी शिक्षक उत्कर्ष पॅनल चे प्रमुख श्री.मंगेश जैवाळ यांनी मावळते चेअरमन श्री. जगत घुगे यांच्या कार्याचा गौरव केला तसेच शिक्षक नेते प्र.स.हुशे यांच्या कार्याची आठवण करून देत श्री. रमेश हुशे यांच्या रूपाने हुशे परिवाराला योग्य सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर श्री. बाबासाहेब जुंबड यांनी श्री. रमेश हुशे यांचे अभिनंदन करताना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी श्री. अरुण जाधव, श्री. बबनराव बोरुडे,श्री.जगत घुगे, श्रीमती साधना जैवाळ,श्री.राजेंद्र कायंदे व श्री.ईश्वर गाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.




