pub-7425537887339079
ब्रेकिंग

कोरड्या विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याचे ५ दिवसांनंतर यशस्वी रेस्क्यू; युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया व वन विभागाची संयुक्त कारवाई

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.6

एका कोरड्या विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याचे युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया (UGFI) तर्फे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सदर कोल्हा सुमारे चार ते पाच दिवसांपासून त्या विहिरीमध्ये अडकलेला होता या संदर्भात कॉल प्राप्त होताच UGFI च्या ॲनिमल रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली ॲनिमल रेस्क्यू हेड वैभव लाखोले यांच्या नेतृत्वाखाली, मॅनेजिंग डायरेक्टर दुर्गेश बनकर व डायरेक्टर ज्ञानेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ऑपरेशन राबविण्यात आले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सर्वप्रथम वन विभागाशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. विहिरीची खोली, कोल्ह्याची भीतीग्रस्त अवस्था आणि मर्यादित जागा या सर्व अडचणींवर मात करत टीमने अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने काम केले अखेर कोणतीही जीवितहानी न होता कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर वन विभागाच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या देखरेखीखाली त्या कोल्ह्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सुखरूप सोडण्यात आले. वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व कोल्ह्यासारखे वन्यप्राणी पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहेत. ते उंदीर कीटक यांसारख्या लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवून शेती व परिसंस्थेचे संतुलन राखण्यास मदत करतात. अशा प्राण्यांचे संरक्षण करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पर्यावरण आणि मानवजीवनाचे रक्षण करणे होय जनतेसाठी आवाहन युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया ही संस्था सातत्याने वन्यजीव संरक्षण, प्राणी बचाव, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी www.unitedglobalfederation.org या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच कुठेही अडचणीत सापडलेले प्राणी आढळल्यास युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया च्या ॲनिमल रेस्क्यू पोर्टलचा वापर करून तत्काळ मदत मिळवता येऊ शकते, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या यशस्वी मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया टीमच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे