pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णीच्या डॉक्टर पंडित सुरुसे च्या नेतृत्वात फिटनेस, भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी जाफ्राबाद–पंढरपूर सायकल वारी ९ जुलैपासून

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6

भोकरदन-जाफ्राबाद सायकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी भव्य भोकरदन–पंढरपूर सायकल वारी येत्या 9 जुलैपासून सुरू होत आहे. भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील सायकलिस्ट वारकरी तब्बल 400 किलोमीटरचा सायकल प्रवास करून 11 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. ही वारी केवळ पंढरपूर दर्शनापुरती मर्यादित नसून फिटनेस, पर्यावरण संवर्धन, सामाजिक ऐक्य आणि विठ्ठल भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. सायकलिंगमुळे निरोगी जीवनशैली, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचविला जाणार आहे. भोकरदन–जालना–गेवराई–बार्शी–पंढरपूर असा या वारीचा मार्ग असून, संपूर्ण प्रवासात विठ्ठल नामाचा गजर, शिस्तबद्ध सायकल रॅली आणि जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १२ जुलै रोजी पंढरपूर येथे सर्व सायकलिस्ट वारकरी भव्य रिंगण सोहळा आणि नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार असून, त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन वारीची सांगता होणार आहे. या वारीचे अध्यक्ष डॉ. पंडित सुरशे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सचिव लक्ष्मण सुरडकर आणि वारी प्रमुख डॉ. राहुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असून, सहभागी सायकलिस्ट वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “फिट राहूया, सायकल चालवूया आणि विठ्ठल भक्तीचा संदेश घराघरात पोहोचवूया” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही सायकल वारी मराठवाड्यातील फिटनेस आणि भक्तीचा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून ओळख निर्माण करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे