साई ट्रस्ट ज ने पोर्ट विद्यालय शेवा प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचा हुशार, मेहनती आणि गुणी विद्यार्थी कु. नमित प्रदीप वाघावले याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८पैकी २४० गुण मिळवून रायगड जिल्हा राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा आणि शाळेतून व उरण तालुक्यातून १ ला येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याला वर्ग शिक्षिका श्रीम. वंदना कपूर, श्रीम. सारिका तायडे, श्रीम. योगसाधना पाटील, श्रीम. सचिता वाघावले या मेहनती शिक्षिकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच कु. नमित याचे पालक यांनी सुध्दा खूप मेहनत घेतली. कु. नमित वाघावले याने शाळेचे नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात उंचावले आहे. तसेच शाळेचे ७ हुशार व मेहनती विद्यार्थी उत्तीर्ण (पात्र )झाले आहेत.त्याच्या या
उज्ज्वल यशाबद्दल साई ट्रस्ट चे अध्यक्ष नरसू पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड, गिरीश पाटील,भुषण जाधव, अंकुश जोगळे, श्रीम. वैशाली बोरचटे, ज्येष्ठ कलाशिक्षक मिलिंद ठाकूर, श्रीम. सुमन पाटील, श्रीम. भारती कांबळे, पंडित गणेश बंडा, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ आणि पालक संघर्ष समिती पदाधिकारी आणि तमाम पालक वर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे.त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसंकल्प समालोचक असोसिएशन उरण, रायगड. तर्फे विध्यार्थिनीस शैक्षणिक अर्थसहाय्य.
9 hours ago
मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त जे एस पटेल व उरण परवाना आधिकारी सुरेश बागुलगावे या अधिकाऱ्यांनी उरण दिघोडे येथील घटनास्थळी भेट देऊन केली नुकसानाची पाहणी
9 hours ago
आ. महेश बालदी यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करण्याच्या मागणीसाठी १ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर निघणार महाविकास आघाडीचा मोर्चा.
9 hours ago
राज्यस्तरीय शालेय सेपाकटाकरा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींची चमकदार कामगीरी; संघाला तृतीय स्थान श्रुती मांटे ची राष्ट्रीय संघात निवड
9 hours ago
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जालना महानगर च्या वतीने अभिवादन
9 hours ago
समतेचा विचार, शिक्षणाचा ध्यास आणि माणुसकीचा अखंड प्रकाश—- चित्रकार संतोष औटी महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन
1 day ago
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधाराना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत शेकडो दिव्यांग धरने आंदोलनात सहभागी
1 day ago
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेला प्राधान्य; तीन महिन्यांनी पुन्हा घेणार कामाचा लेखाजोखा! – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर
1 day ago
निवृत्तीवेतनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
1 day ago
संविधान दिनानिमित्त जालना येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन