pub-7425537887339079
ब्रेकिंग

राजे संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनीची शासकीय न्यायवैद्यक शास्त्र संस्थेत निवड

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

जवखेडा ठेंग (ता. जाफराबाद) : राजे संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जवखेडा ठेंग येथील कु. निकिता वंदना गजानन जाधव हिची शासकीय न्यायवैद्यक शास्त्र संस्था, मुंबई (डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ) येथे निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचान्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वांनी तिचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, इतर विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून कु. निकिता जाधव हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये मानाचा तुरा रोडला गेला आहे. राजे संभाजी विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होत आहे. याप्रसंगी प्राचार्य ठालेसह प्राध्यापक वाघ, व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे