pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना शहरातील विस्कळीत व दूषित पाणीपुरवठ्याबाबत सर्व नगरसेवकांची विशेष बैठक आयुक्तांनी तात्काळ बोलवावी – संध्या संजय देठे

0 4 9 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

 

जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती तथा प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका *सौ. संध्या संजय देठे* यांनी आज आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांना तीव्र शब्दांत लेखी निवेदन देऊन जालना शहराच्या गंभीर पाणी प्रश्नावर तात्काळ विशेष बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

1 यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टीमुळे नोव्हेंबर २०२६ ते जुलै २०२७ या कालावधीत भीषण पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे नियोजन, टँकर, जलस्रोतांचे व्यवस्थापन यावर सर्व नगरसेवकांसमवेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ आपत्कालीन बैठक होणे गरजेचे आहे.

2 गेल्या १० महिन्यांपासून प्रभाग क्र. ९ मधील उड्डाण कॉम्प्लेक्स पाठीमागील परिसरातील जवळपास १००० नागरिकांना अनियमित व दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईन गळतीमुळे गटारीचे पाणी थेट नळाला येत असून नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

3 हा प्रश्न मी स्वतः तीन सर्वसाधारण सभांमध्ये मांडला होता. त्यावेळी पाणीपुरवठा अभियंता श्री. राजेश बगळे यांनी १५ दिवसात सर्व गळती दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही एकही काम झाले नाही. ही बाब प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असून नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.

माझ्या प्रमुख मागण्या:

1 माझ्या प्रभाग क्र. ९ सह जालना शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवकांची तात्काळ आपत्कालीन बैठक आयुक्तांनी आपल्या अध्यक्षतेखाली बोलवावी.

2 आगामी दुष्काळी कालावधीसाठी पाण्याचे नियोजन, टँकर व्यवस्था आणि जलस्रोतांचे नियोजन यावर सर्व नगरसेवकांच्या सूचना घेऊन कृती आराखडा (Action Plan) तयार करावा.

3 शासनाची तात्काळ परवानगी घेऊन उपाययोजना करावी.

4 पाणीपुरवठा अभियंता श्री. बगळे यांच्या कामकाजाचा खुलासा घ्यावा व दूषित पाणीपुरवठा विलंब प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

या विषयावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या हितासाठी मला योग्य तो मार्ग अवलंबावा लागेल याची नोंद घ्यावी, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

——————————————————————
“विस्कळीत व दूषित पाणीपुरवठा आणि पाणीटंचाईचे शून्य नियोजन हा प्रकार म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आयुक्तांनी तात्काळ सर्व नगरसेवकांची विशेष बैठक घ्यावी.” – सौ. संध्या संजय देठे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जालना महानगरपालिका.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे